किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलनवी दिल्ली, (१५ फेब्रुवारी ) – लाइफ मिशन घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने केरळच्या मुख्यमंत्री कार्यालयाचे माजी मुख्य सचिव एम शिवशंकर यांना अटक केल्याचे सूत्रांनी सांगितले. ईडीने शिवशंकर यांना निवृत्तीच्या दिवशी चौकशीसाठी बोलावले होते. त्याची सोमवार आणि मंगळवारी चौकशी करण्यात आली. या प्रकरणातील ही पहिलीच अटक आहे. हे प्रकरण राज्य सरकारच्या लाइफ मिशन प्रकल्पाशी संबंधित आहे. लाइफ मिशन योजनेच्या माध्यमातून, त्रिशूर जिल्ह्यातील वडक्कनचेरी येथे १४० कुटुंबांसाठी घरे बांधण्यासाठी करार करण्यात आला. या योजनेसाठी १८.५० कोटींपैकी १४.५० कोटी रुपये रेड क्रेसेंटने युएई वाणिज्य दूतावासाद्वारे दिले आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, दक्कनचेरी लाईफ मिशन प्रकरणात स्वप्ना सुरेशच्या बँक लॉकरमधून सुमारे एक कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. ही रक्कम शिवशंकरने लाईफ मिशनमध्ये लाच म्हणून घेतल्याचे स्वप्ना सुरेश यांनी चौकशीदरम्यान उघड केले होते. मात्र तीन दिवस सतत चौकशी करूनही शिवशंकरने गुन्ह्याची कबुली दिली नाही. पण नंतर पुरेसे पुरावे आणि त्याच्या परस्परविरोधी विधानांमुळे ईडीने त्याला अटक केली. केंद्रीय यंत्रणांनी शिवशंकरला चौथ्यांदा अटक केली आहे. यापूर्वी २८ ऑक्टोबर २०२० रोजी ईडीने त्याला सोन्याच्या तस्करीशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक केली होती. एनआयएने त्याला २५ नोव्हेंबर रोजी सोन्याच्या तस्करीच्या प्रकरणात अटक केली होती. २० जानेवारी २०२१ रोजी कस्टमने त्याला डॉलर तस्करी प्रकरणात अटकही केली. सलग ६९ दिवस तुरुंगात काढल्यानंतर शिवशंकर यांची सुटका झाली. त्यांना सेवेतून निलंबित करण्यात आले मात्र नंतर त्यांना पुन्हा सेवेत घेण्यात आले.