किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलराहुल गांधींची प्रतिष्ठा पणाला,
वायनाड, ५ एप्रिल – केरळा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारतोफा रविवारी थंडावल्या. वायनाड जिल्ह्यातील तीन मतदारसंघात चुरशीची लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
२०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी उमेदवारी दाखल केल्यानंतर हा जिल्हा प्रकाशझोतात आला होता. वायनाड जिल्ह्याने राहुल गांधी यांना लोकसभेत पाठवले असले, तरी कॉंग्रेसच्या नेतृत्वातील यूडीएफ आघाडीसाठी विधानसभा निवडणूक सोपी नाही. त्यांची प्रतिष्ठा या जिल्ह्यात पणाला लागली आहे. वायनाडमध्ये सुल्तान बाथरी, कालेपट्टा आणि मनांथवादी हे तीन विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यापैकी सुल्तान बाथरी आणि मनांथवादी हे दोन मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत, तर कालेपट्टा हा सर्वसाधारण मतदारसंघ आहे. विद्यमान आमदार आय. सी. बालकृष्णन् हे तिसर्यांदा यूडीएफच्या तिकिटावर सुल्तान बाथरी येथून निवडणूक लढत आहेत. ते कुरिचिया समुदायाचे नेतृत्व करतात. ही जागा ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न ते करीत आहेत. माकपाने या मतदारसंघातून एम. एस. विश्वनाथन् यांना उमेदवारी दिली. ते केरळ कॉंग्रेसचे सरचिटणीस होते. पक्षाने उमेदवारी नाकारल्यामुळे त्यांनी माकपात प्रवेश केला. यूडीएफचा गड असलेल्या सुल्तान बाथरीमधील कुरुमा समुदायाची मते मिळवण्याचा प्रयत्न विश्वनाथन् यांना उमेदवारी देऊन माकपाकडून केला जात आहे.
सुल्तान बाथरी मतदारसंघात रालोआने आदिवासी नेते सी. के. जानू यांना उमेदवारी दिली आहे. ते आदिया समुदायाचे असून, त्यांनी आदिवासींच्या प्रश्नांसाठी संघर्ष केला आहे तसेच मुथुंगा आंदोलनावेळी ते आघाडीवर होते. त्यांना उमेदवारी देऊन आम्ही समाजातील वंचित घटकांसोबत असल्याचा संदेश भाजपाने दिला आहे.
अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या मनांथवादी मतदारसंघातही चुरशीची लढत होणार आहे. २०१६ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत एलडीएफच्या ओ. आर. केलू यांचा या मतदारसंघातून विजय झाला होता. माजी मंत्री पी. के. जयालक्ष्मी यांना त्यावेळी यूडीएफने उमेदवारी दिली होती. विद्यमान आमदार ओ. आर. वेलू यांना यंदा माकपाने, तर पी. के. जयालक्ष्मी यांना यूडीएफने उमेदवारी दिली. रालोआ आघाडीने मुकुंदन् पल्लियारा यांच्यावर विश्वास दाखवला आहे. वायनाड जिल्ह्यातील कालेपट्टा हा सर्वसाधारण मतदारसंघ असून, येथील लढत तिरंगी ठरणार आहे. २०१६ मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत माकपाचे सी. शशिधरन् यांनी जदयूचे उमेदवार एम. व्ही. श्रेयम्सकुमार यांचा पराभव केला. श्रेयम्सकुमार यांनी आता यूडीएफमध्ये प्रवेश केला आहे. या मतदारसंघात एलडीएफचे प्रमुख एम. व्ही. श्रेयम्सकुमार, कोझिकोड डीसीसीचे अध्यक्ष टी. सिद्दिकी यूडीएफच्या तिकिटावर लढत आहेत. भाजपाने या मतदारसंघात टी. एम. सुबीश यांना उमेदवारी दिली आहे.