किमान तापमान : 30.02° से.
कमाल तापमान : 30.99° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 45 %
वायू वेग : 2.45 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
30.99° से.
26.96°से. - 31°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.01°से. - 30.73°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.06°से. - 30.41°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.16°से. - 31.05°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.39°से. - 30.44°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.66°से. - 30.5°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाशनवी दिल्ली, (१९ फेब्रुवारी) – दिल्ली – फाजिल्का नॅशनल हायवे टोल प्लाझा येथे शेतकर्यांनी केलेल्या आंदोलनादरम्यान कर्तव्यावर असलेल्या होमगार्ड जवानाला भरधाव कारने चिरडले. या अपघातात होमगार्ड जवानाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. रविवारी रात्री उशिरा ही घटना घडली. चरणजीत सिंग असे मृताचे नाव आहे. दुसरीकडे घटनेनंतर चालकाने कार तेथेच टाकून घटनास्थळावरून पळ काढला.
मिळालेल्या माहितीनुसार, युनायटेड किसान मोर्चा आपल्या मागण्यांसाठी दोन दिवसांपासून दिल्ली-फाजिल्का हायवेवरील टोल प्लाझावर आंदोलन करत आहे. त्यामुळे वाहने टोलमुक्तीतून जात आहेत. आंदोलनस्थळी गृहरक्षक जवान चरणजित सिंग यांना लांबी पोलीस ठाण्याच्या चौकीत वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी बंदोबस्त ठेवण्यात आला होता. रविवारी सायंकाळी उशिरा भरधाव वेगात आलेल्या कारने ड्युटीवर असलेल्या चरणजित सिंग यांना चिरडले.