किमान तापमान : 28.43° से.
कमाल तापमान : 28.99° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 61 %
वायू वेग : 2.87 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
28.99° से.
27.65°से. - 29.75°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर घनघोर बादल28.17°से. - 30.49°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.6°से. - 30.66°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर साफ आकाश27.16°से. - 30.26°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.33°से. - 29.95°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.04°से. - 29.71°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश– सर्वजण न बोलावता देवाच्या द्वारी जाऊ शकतात,
गांधीनगर, (१२ जानेवारी) – काँग्रेस नेतृत्वाने अयोध्येतील श्रीराममंदिर सोहळ्याचे निमंत्रण न स्वीकारल्याने गुजरात काँग्रेस नेत्यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे. प्रदेशाध्यक्ष गोहिल यांनी पक्षाच्या वतीने स्पष्टीकरण दिले. मात्र, अशा नाराजीमुळे भाजपाच्या हाती तयार मुद्दा मिळाल्याचे राजकीय विश्लेषकांनी म्हटले आहे.
माजी प्रदेशाध्यक्ष तसेच विद्यमान आमदार अर्जुन मोढवाडिया यांनी समाज माध्यमात आपल्या भावना व्यक्त केल्या. भगवान श्रीराम आराध्य देव असून, देशवासीयांच्या श्रद्धा आणि विश्वासाचे प्रतीक आहे. पक्ष नेतृत्वाने सोहळ्याचे निमंत्रण अव्हेरण्याच्या राजकीय निर्णयपासून दूर राहणे गरजेचे होते, असे त्यांनी म्हटले आहे. माजी आमदार तसेच कार्यकारी अध्यक्ष अंबरीश डेर यांनी सुद्धा आपली नाराजी व्यक्त केली. भारतीय काँग्रेसमधील काही लोकांनी श्रीराम मंदिर सोहळ्यासंदर्भात राजकीय वक्तव्य करण्यापासून दूर राहणे अपेक्षित होते. लोकांच्या भावनांचा सन्मान करणे आवश्यक आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. याशिवाय गुजरात काँग्रेसच्या माध्यम विभागाचे सह संयोजक तसेव प्रवक्ता हेमांग रावल यांनी या मुद्यावर नाराजी व्यक्त केली. दरम्यान, प्रदेशाध्यक्ष शक्तीसिंह गोहिल यांनी नेतृत्वाची बाजू सावरत स्पष्टीकरण सादर केले. हिंदू धर्मात सर्वांत मोठे निर्णय घेणारे शंकराचार्यजी महाराज यांनी संबंधित मंदिर पूर्ण झाले नसून, आता प्राणप्रतिष्ठा करू नये, असे म्हटले आहे. भाजपा निवडणूक पाहून अशाप्रकारे राजकीय उपक्रम सादर करीत असते, त्यामुळे तिथे कोण जाईल. मंदिरात जाण्यासाठी कोणत्याही निमंत्रणाची गरज नसते. सर्वजण न बोलावता देवाच्या द्वारी जाऊ शकतात. ज्यावेळी पूर्ण मंदिर तयार होईल, तेव्हा आस्था असलेला प्रत्येक काँग्रेस कार्यकर्ता अयोध्येला जाईल, असे प्रदेशाध्यक्ष गोहिल यांनी स्पष्ट केले.