किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलचेन्नई, (२०सप्टेंबर) – अस्पृश्यता संपुष्टात आणण्यासाठी सनातन धर्म संपवावा लागेल, असा पुनरुच्चार तामिळनाडूतील क्रीडा मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी केला आहे. राज्यपाल आर. एन. रवी यांच्या वक्तव्यावर टीका करताना उदयनिधी यांनी ही टिप्पणी केली. दुर्दैवाने आपल्या समाजात भेदभाव आहे. मोठ्या वर्गातील बहीण-भावाकडे समानतेच्या नजरेने पाहिले जाऊ शकत नाही. हिंदू धर्मात असे करायला सांगितले जात नाही. हा समाजातील वाईटपणा आणि निश्चितच हा प्रकार संपुष्टात यावा, असे आर. एन. रवी यांनी एका कार्यक्रमाला संबोधित करताना म्हटले होते.
आर. एन. रवी यांच्या या वक्तव्यावर टीका करताना स्टॅलिन यांनी म्हटले, जातीय भेदभाव संपवण्यासाठी सनातन धर्म संपवला पाहिजे. सनातन धर्म नष्ट झाल्यास अस्पृश्यताही संपुष्टात येईल, असे मी समजतो. सामाजिक न्याय कायम ठेवण्यासाठी सर्व जण लढत आहेत. मात्र, भाजपा यात अडचणी निर्माण करीत आहे, असे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी ऑल इंडिया फेडरेशन फॉर सोशल जस्टिसच्या कार्यक्रमाला संबोधित करताना सांगितले होेते.