किमान तापमान : 27.33° से.
कमाल तापमान : 27.99° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 51 %
वायू वेग : 3.44 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.99° से.
27.56°से. - 30.97°से.
शुक्रवार, 15 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.35°से. - 30.7°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.27°से. - 30.86°से.
रविवार, 17 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.52°से. - 31.46°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर साफ आकाश26.53°से. - 30.46°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश25.82°से. - 30.45°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाशहम्पी/अयोध्या, (२० जानेवारी) – कर्नाटकातील हम्पी क्षेत्रात असलेले हनुमंताचे जन्मस्थान किष्किंधा येथील रथ २२ जानेवारी रोजी होणार्या रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्येत दाखल झाला आहे.
देशभरातील मंदिरांचे भ्रमण करीत हा रथ सीतेचे जन्मस्थान असलेल्या नेपाळमधील जनकपूर येथून अयोध्येत दाखल झाला. रथासोबत असलेले १०० भाविक रामनाम आणि राम भजनात तल्लीन झाले होते. प्रभू श्रीरामांच्या आगमनाचा दिवस अत्यंत मोठा आहे. त्या दिवशी देशभरातील लोक अयोध्येला जात असताना हनुमंत मागे कसे राहतील, असा प्रश्न उपस्थित करीत आम्ही मागील दोन महिन्यांपासून रथयात्रा करीत आहोत. अयोध्येत हा रथ २५ जानेवारीपर्यंत राहील, असे श्री हनुमान जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासचे अभिषेक कृष्णशास्त्री यांनी सांगितले.
प्रभू श्रीरामचंद्रांना सेवा देण्यासाठी आम्ही किष्किंधा येथून आलो आहोत. सर्वांत मोठा भक्त असलेल्या हनुमंताला प्रभू श्रीराम कवेत घेत असल्याची मूर्ती या रथावर आहे. अयोध्येत दाखल झाल्यानंतर हा रथ शरयू नदीच्या तीरावर ठेवण्यात आला. येथे तो भाविकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. सोनेरी रंगात नक्षीकाम असलेला हा विशाल रथ मंदिरासारखा दिसतो. रथाच्या एका बाजूला त्याने भेट दिलेल्या विविध ठिकाणांची तसेच यात्रा सुरू केलेल्या दिवसापासूनची छायाचित्रे आहेत. आम्हाला असेच एक मंदिर हनुमंताच्या जन्मस्थानी उभारायचे आहे. यात्रेदरम्यान जो काही निधी आम्हाला मिळाला, त्याचा वापर आम्ही मंदिरासाठी करू, असे कृष्णशास्त्री यांनी सांगितले.