किमान तापमान : 29.99° से.
कमाल तापमान : 30.02° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 51 %
वायू वेग : 2.46 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
29.99° से.
27.48°से. - 31.12°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल26.76°से. - 31°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश25.88°से. - 29.76°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.49°से. - 30.23°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर छितरे हुए बादल25.3°से. - 30.25°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर साफ आकाश25.38°से. - 29.76°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर छितरे हुए बादल-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले हुबळी प्लॅटफॉर्मचे लोकार्पण,
हुबळी, (१३ मार्च) – कर्नाटकच्या हुबळी म्हणजेच सिद्धारूढ स्वामी रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्मची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे. सुमारे २०.१ कोटी रुपये खर्चून बांधलेला दीड किलोमीटर लांबीचा हा प्लॅटफॉर्म जगातील सर्वांत मोठा रेल्वे प्लॅटफॉर्म आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी या प्लॅटफॉर्मचे लोकार्पण केले.
वैशिष्ट्ये : हुबळीच्या सिद्धारुढ स्वामी रेल्वे स्थानकावरील हा प्लॅटफॉर्म दीड किलोमीटर अंतराचा आहे. या प्लॅटफॉर्मचे बांधकाम फेब्रुवारी २०२१ मध्ये सुरू करण्यात आले होते. हुबळी येथील हे जंक्शन बंगळुरू, होसापेटे आणि वास्को द गामा या ठिकाणांशी जोडले गेलेले आहे. हुबळी रेल्वे स्थानकात वाढत असलेली गर्दी पाहून आणखी तीन प्लॅटफॉर्म येथे बांधण्यात आले. प्लॅटफॉर्म क्रमांक ८ हा १,५०७ मीटर लांबीचा आहे. त्यामुळे हा प्लॅटफॉर्म जगातला सर्वांत लांब प्लॅटफॉर्म म्हणून गौरवला जातो.
इलेक्ट्रिक इंजिन असलेल्या दोन रेल्वेगाड्या एकाचवेळी या लांब प्लॅटफार्मवरून सुटू शकतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्लॅटफॉर्मच्या लोकार्पणासह ११८ किलोमीटर लांबीच्या बंगळुरू-म्हैसूर एक्सप्रेस-वेचे उद्घाटन केले. या महामार्गासाठी ८,४८० कोटी रुपये निधी खर्च झाला आहे. त्यामुळे तीन तासांच्या प्रवासाचा वेळ ७५ मिनिटांवर येणार आहे.