किमान तापमान : 30.86° से.
कमाल तापमान : 33.99° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 33 %
वायू वेग : 2.33 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
33.99° से.
27.71°से. - 33.99°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.26°से. - 30.15°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.44°से. - 29.38°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर कुछ बादल25.92°से. - 29.75°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर कुछ बादल25.79°से. - 29.45°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर कुछ बादल25.83°से. - 29.54°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर साफ आकाशनवी दिल्ली, (१३ मार्च) – आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या १०० दिवसांच्या उलटगणनेनिमित्त आयोजित केलेला तीन दिवसीय योग महोत्सव उत्साहाने साजरा करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी नागरिकांना केले. योग केला नसल्यास, त्याला जीवनाचा भाग बनवा, असेही नरेंद्र मोदी म्हणाले.
तीन दिवसीय योग महोत्सव हा दिल्लीतील तालकटोरा मैदानावर १३-१४ मार्च रोजी आणि येथीलच मोरारजी देसाई नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ योग येथे १५ मार्च रोजी आयोजित केला आहे. आंतरराष्ट्रीय योगदिनासाठी १०० दिवस आहेत. तुम्हा सर्वांना तो उत्साहाने साजरा करण्याच आवाहन करतो. तुम्ही जर योगाला जीवनाचा एक भाग बनवले नसेल तर, ते लवकरात लवकर करा, असे मोदी यांनी योग महोत्सवाबाबत केंद्रीय आयुष मंत्रालयाचे ट्विट शेअर करीत केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. २०१४ मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेत स्वीकारल्यानंतर २०१५ पासून आंतरराष्ट्रीय योगदिन २१ जून रोजी जगभरात साजरा केला जातो.