किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादल– पाकिस्तानी ध्वजापेक्षा १८ फूट जास्त उंच खांब,
– ९० किलो असेल झेंड्याचे वजन,
अमृतसर, (१६ सप्टेंबर) – भारतीयांसाठी सर्वाधिक ऊर्जेचे स्थान असलेल्या अटारी सीमेवर असलेल्या तिरंग्याच्या खांबाची उंची शेजारी देश पाकिस्तानपेक्षा १८ फुटांनी वाढविण्यात आली आहे. आधीच्या भारतीय ध्वजाच्या खांबाची उंची ३६० फूट होती, तर पाकिस्तानच्या ध्वजाच्या खांबाची उंची ४०० फूट आहे. त्यामुळे पाकिस्तानपेक्षा उंच आपला तिरंगा असावा म्हणून उंची वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अटारी सीमेवरील गोल्डन गेटसमोर भारताचा ४१८ फूट उंच ध्वजस्तंभ तयार असून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे.
प्राप्त माहितीनुसार, हे उद्घाटन काही दिवसांत होणार होते, मात्र काही कारणांमुळे ते पुढे ढकलण्यात आले आहे. लवकरच या ४१८ फूट उंच ध्वज खांबावर भारतीय तिरंगा फडकताना दिसणार आहे. हा ध्वज खांब भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) ३.५ कोटी रुपये खर्च करून बसवला आहे. ३६० फूट उंचीच्या जुन्या ध्वज खांबापासून १०० मीटर अंतरावर गोल्डन गेटसमोर हा ध्वज खांब बसवण्यात आला आहे. जमिनीपासून ४ फूट उंचीचा पाया तयार करण्यात आला असून, त्यावर हा ध्वज खांब उभारण्यात आला आहे. जुना ध्वज खांब अमृतसर सुधार ट्रस्टने २०१७ मध्ये बांधला होता.
भारताचे पाहून पाकिस्तानने वाढवली होती उंची
भारताने २०१७ मध्ये ३६० फूट उंच ध्वज खांब बसवल्यानंतर त्याच वर्षी पाकिस्तानने आपल्या सीमेवर ४०० फूट उंच ध्वज खांब बसवला. पाकिस्तानकडून ध्वज फडकावण्यावरून दोन्ही देशांमध्ये बराच वाद झाला होता. पाकिस्तानी ध्वजाच्या खांबावर कॅमेरे लावण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे, ज्यावर पाकिस्तान भारतीय हद्दीत अनेक किलोमीटरपर्यंत नजर ठेवू शकतो. सध्या एनएचएआयने नवीन ध्वज खांबाच्या उद्घाटनासाठी सुमारे पाच राष्ट्रध्वज ठेवले आहेत, ज्याची लांबी आणि रुंदी १२०८० फूट आहे. प्रत्येक तिरंग्याचे वजन ९० किलो आहे. आतापर्यंत देशाचा सर्वात उंच ध्वज कर्नाटकच्या बेळगाव येथे फडकत आहे. ज्यांची उंची ११० मीटर म्हणजेच ३६०.८ फूट आहे, जी अटारी सीमेवर आतापर्यंत फडकवलेल्या तिरंग्यापेक्षा फक्त ८ फूट जास्त आहे. मात्र, नवीन ध्वज खांबाच्या उद्घाटनानंतर अटारी सीमेवर देशातील सर्वात उंच तिरंगा फडकवण्यात येणार आहे.