किमान तापमान : 23.81° से.
कमाल तापमान : 23.93° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 57 %
वायू वेग : 4.88 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.93° से.
23.71°से. - 24.88°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.37°से. - 25.6°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.45°से. - 26.84°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश23.9°से. - 25.67°से.
बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश23.94°से. - 25.02°से.
गुरुवार, 16 जानेवारी घनघोर बादल23.69°से. - 26.74°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादलनवी दिल्ली,, (३० सप्टेंबर) – अभिनेत्री अर्चना गौतमने एक खळबळजनक आरोप केला आहे. अभिनेत्रीने सांगितले की, दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयाच्या भेटीदरम्यान तिला आणि तिच्या वडिलांना मारहाण करण्यात आली. बिग बॉस १६ आणि खतरों के खिलाडी सारख्या रिअॅलिटी शोमध्ये आपल्या उपस्थितीने प्रसिद्ध झालेल्या अर्चना गौतमने सांगितले की, या हिंसाचाराला जबाबदार असलेले लोक काँग्रेस पक्षाशी संबंधित होते. या घटनेचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये अभिनेत्रीला अनेक लोकांनी घेरले आहे आणि आरडाओरडा करताना दिसत आहे.
अर्चना वडिलांसोबत दिल्लीतील काँग्रेस कार्यालयात गेल्या होत्या. मात्र, त्यांना काँग्रेस कार्यालयात प्रवेश दिला गेला नाही. अर्चना गौतमचा आरोप आहे की, तिथे उपस्थित असलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी तिला मारहाण केली. महिला आरक्षण विधेयक मंजूर झाल्याबद्दल काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि प्रियांका गांधी यांचे अभिनंदन करण्यासाठी मी नुकतेच पक्षाच्या मुख्यालयात पोहोचल्याचे तिने मीडियाला सांगितले. अर्चना गौतम म्हणाल्या, ’मी काँग्रेस पक्ष कार्यालयात जात होते. पण मला थांबवण्यात आलं. यानंतर कार्यालयाबाहेर मला शिवीगाळ व मारहाण करण्यात आली. माझ्या वडिलांनी मला वाचवले आणि त्यांनी मला गाडीत बसवले. पण मी शांत बसणारा नाही.
ती म्हणाली, ’काँग्रेस पक्ष माझ्यासारख्या अभिनेत्रीसोबत गैरवर्तन करू शकतो, तर इतरांचे काय होणार? मी गप्प बसणार नाही, आम्ही लढा सुरूच ठेवणार आहोत. माझ्यासोबत जे घडले ते धक्कादायक असून काँग्रेस कार्यकर्त्यांचे वर्तन चुकीचे आहे. अर्चना गौतमचे वडील गौतम बुद्ध या घटनेबाबत मेरठमध्ये कायदेशीर कारवाई करू शकतात, असे सांगण्यात येत आहे. याव्यतिरिक्त, ते परिस्थितीवर पत्रकार परिषद देखील घेऊ शकतात. उल्लेखनीय आहे की, मार्च २०२२ मध्ये गौतम बुद्ध यांनी प्रियांका गांधी वाड्रा यांचे स्वीय सहाय्यक संदीप कुमार यांच्या विरोधात औपचारिक तक्रार दाखल केली होती आणि आरोप केला होता की त्यांनी अर्चना गौतम यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती.
अर्चना गौतमच्या वडिलांनी तक्रारीत म्हटले आहे की, त्यांच्या मुलीला जातीवाचक भाषा वापरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. अभिनेत्रीचा काँग्रेस पक्षाशी संबंध नोव्हेंबर २०२१ मध्ये सुरू झाला, त्यानंतर तिने हस्तिनापूर मतदारसंघातून २०२२ ची यूपी विधानसभा निवडणूक अयशस्वीपणे लढवली. मात्र, आता या प्रकरणावर प्रियांका गांधी वढेरा काय प्रतिक्रिया देतात हे पाहावे लागेल, कारण त्या स्वतः एक महिला आहेत आणि त्यांनीही ’मी एक मुलगी आहे, मी महिला अत्याचाराविरोधात लढू शकते’ असा नारा दिला आहे.त्यामुळे त्या पक्षाच्या नेत्यांना दोष देतील का? कारवाई करणार का? कारण प्रियंका गांधी यांनी अर्चना गौतमला लडकी हूं लड शक्ती हूची पोस्टर गर्ल बनवली होती.