किमान तापमान : 24.59° से.
कमाल तापमान : 25.79° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 48 %
वायू वेग : 5.84 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.59° से.
23.83°से. - 25.97°से.
शुक्रवार, 24 जानेवारी छितरे हुए बादल23.33°से. - 26.99°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.01°से. - 27.57°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.47°से. - 27.72°से.
सोमवार, 27 जानेवारी टूटे हुए बादल25.66°से. - 27.64°से.
मंगळवार, 28 जानेवारी साफ आकाश25.05°से. - 27.04°से.
बुधवार, 29 जानेवारी टूटे हुए बादलनवी दिल्ली, (२९ जानेवारी) – केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. १ फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर होणार आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदी सरकारचा संपूर्ण अर्थसंकल्प असेल. या वर्षातील ही पहिलीच मंत्रिमंडळ बैठक आहे, जी सकाळी १० वाजता सुरू झाली आणि संध्याकाळी संपेल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, यावेळी पंतप्रधान मोदी विविध मंत्रालयांच्या कामकाजाचा आढावा घेतील. अर्थमंत्री निर्मला सीतारामनही येथे अर्थसंकल्पावर चर्चा करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याच वेळी, काही मंत्रालयांमधील काम थोडेसे संथगतीने चालले आहे, ज्यावर पंतप्रधान मोदी विशेष सूचना देऊ शकतात.
मोदी मंत्रिमंडळातही बदलाचे वारे वाहू लागले आहेत. दरम्यान, पंतप्रधानांनी बोलावलेली मंत्रिमंडळ बैठक अतिशय खास आहे. अहवालानुसार या वर्षी ९ राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्याआधी मोदी मंत्रिमंडळात फेरबदलाची गरज भासू लागली आहे. अनेक मंत्रालयांमध्ये बदल अपेक्षित असल्याचे बोलले जात आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाबाबत पंतप्रधान मोदी सर्व मंत्र्यांना विशेष सूचना देऊ शकतात, असे सांगण्यात येत आहे. अहवालात असे म्हटले आहे की मोदी सरकारचा हा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प असल्याने पंतप्रधानांना असे वाटते की, अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सर्व मंत्र्यांनी त्याचे लोककल्याणकारी पैलू लोकांपर्यंत नेण्याचे काम करावे. वृत्तानुसार, बैठकीत ॠ-२० च्या अध्यक्षपदी भारताशी संबंधित कार्यक्रमांवरही चर्चा होऊ शकते. ॠ-२० शी संबंधित सुमारे २०० कार्यक्रम देशभरात ५० हून अधिक ठिकाणी होणार आहेत.
ॠ२० देशांसोबत, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँकेसह १४ आंतरराष्ट्रीय संस्था देखील या कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत, त्यामुळे भारत सरकार हे कार्यक्रम भव्य करण्यासाठी कोणतीही कसर सोडू इच्छित नाही. या कार्यक्रमांमध्ये जास्तीत जास्त लोकांचा सहभाग सुनिश्चित करायचा आहे, असे या अहवालात म्हटले आहे. मोदी मंत्रिमंडळातील फेरबदल आणि विस्ताराच्या बातम्यांदरम्यान मंत्र्यांनीही आपापल्या मंत्रालयाच्या कामकाजाबाबत सादरीकरण करणे अपेक्षित आहे. सूत्रांच्या हवाल्याने, अहवालात असे म्हटले आहे की २९ जानेवारी रोजी होणार्या या बैठकीनंतर काही दिवसांनी मंत्रिमंडळ फेरबदलाची कार्यवाही सुरू होऊ शकते.