किमान तापमान : 23.21° से.
कमाल तापमान : 23.65° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 6.04 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.21° से.
22.99°से. - 26.39°से.
शुक्रवार, 24 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
सोमवार, 27 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
मंगळवार, 28 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
बुधवार, 29 जानेवारी टूटे हुए बादलमुंबई, (११ एप्रिल) – भारताकडे विश्वातील सर्वश्रेष्ठ तत्त्वज्ञान आहे, पण अलिकडे तत्त्वानुसार व्यवहार केला जात नाही. त्यासाठी आदर्श हिंदू जीवन पद्धतीचा अंगीकार करावा लागेल. अशोक चौगुले हे आदर्श हिंदू जीवनपद्धतीचे एक उदाहरण आहे. त्यांच्याप्रमाणे सर्वांनी व्यवहार करावा, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले.
प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिर सभागृहात विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व सामाजिक-शैक्षणिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणारे सुप्रसिद्ध उद्योजक अशोक चौगुले यांचा ‘अमृत महोत्सव’ सोहळा श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोंविद देव गिरी महाराज यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. याप्रसंगी केंद्रीय पर्यटन आणि बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग राज्यमंत्री श्रीपाद नाईक, राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा, पू. ब्रह्मेशानंद आचार्य स्वामी, विश्व हिंदू परिषदेचे महामंत्री मिलिंद परांडे, सत्कार समितीचे कार्याध्यक्ष सुरेश भगेरिया आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
याप्रसंगी सरसंघचालक डॉ. भागवत यांच्या हस्ते अशोक चौगुले यांचा शाल, श्रीफळ व चाफ्याची परडी देऊन सत्कार झाला तर. स्वामी गोंविद देव गिरी महाराज यांच्या हस्ते वटवृक्षाची प्रतिकृती व शाल देऊन सत्कार करण्यात आला. सुधा अशोक चौगुले यांचा सत्कार समितीच्या सदस्य डॉ.अलका मांडके व डॉ.अस्मिता हेगडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सरसंघचालक आपल्या भाषणात म्हणाले की, भारत हा विश्वगुरू आहेच, पण समोर काही आव्हाने उभी आहेत. हे आव्हान भेदून काढण्यासाठी देशात सजग व सशक्त पिढी निर्माण करणे आवश्यक आहे.
चौगुले यांच्या पंचाहत्तरीनिमित्त अरविंद सिंह यांनी संपादित केलेल्या ‘फोर डिकेड्स ऑफ हिंदू रेनसान्स’ या इंग्रजी पुस्तकाचे तर हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष तथा पद्मश्री रमेश पतंगे यांच्या ‘मी, मनु आणि संघ’ या मराठी पुस्तकाचे ‘द आरएसएस, मनू अॅण्ड आय’ इंग्रजी भाषेत अनुवाद करण्यात आले आहे. या दोन्ही पुस्तकाचे मान्यवरांचे हस्ते प्रकाशन करण्यात आले.