किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलनवी दिल्ली, ५ नोव्हेंबर – देशातील सर्व बँका ‘कर्ज स्थगिती’ (लोन मोरेटोरियम) योजनेचा फायदा घेणार्या कर्जदारांकडून घेतेलेले ‘व्याजावरील व्याज’ परत करण्यास सुरुवात करत आहेत. बँका आणि वित्तीय संस्थांकडून २ कोटीपर्यंतचे कर्ज घेणारे वैयक्तिक कर्जदार ते छोटे व्यापारी सर्वांना ‘कॅशबॅक’ देण्यास सुरुवात होत आहे. ज्यांनी कर्जस्थगिती योजनेसाठी अर्ज केले नव्हते अशा कर्जदारांना देखील बँकांकडून पैसे परत मिळत आहेत.
२ कोटींपर्यंतचे कर्ज घेणारे आणि कोरोना काळातही कर्जाचा ईएमआय नियमतिपणे भरणार्या कर्जदारांना व्याजावरील व्याज परत देण्यात यावे, असे भारतीय रिझर्व्ह बँकेने गेल्या आठवड्यात देशातील सर्व बँका आणि वित्तीय संस्थांना सांगितले होते. कोरोनाचे देशव्यापी संकट पाहता आरबीआयने हे पाऊल उचलले. बँकांना ५ नोव्हेंबरपासून ही योजना लागू करण्यास सांगितले होते.
कोरोना काळात आरबीआयने १ मार्च २०२० ते ३१ ऑगस्ट २०२० या सहा महिन्यांच्या कालावधीसाठी कर्ज किंवा क्रेडिट कार्ड थकबाकीचा मासिक हप्ता न देण्याची सूट देण्यात आली होती.
सर्वोच्च न्यायालयाने दखल घेतल्यानंतर केंद्र सरकारने कर्जस्थगिती कालावधी दरम्यान कर्जदारांवर लावण्यात आलेल्या चक्रवाढ व्याज आणि साधारण व्याज यामधील फरकाइतकी रक्कम कर्जदारांना परत करण्यास मंजुरी दिली आहे. यानंतर केंद्रीय बँकेने सर्व बँका आणि नॉन बँकिंग वित्तीय कंपन्यांना ५ नोव्हेंबरपासून व्याजमाफी योजना लागू करण्यास सांगितले होते. ही योजना आठ प्रकारच्या कर्जावर लागू होईल. यामध्ये एमएसएमई कर्ज, शैक्षणिक कर्ज, गृहकर्ज, ग्राहक कर्ज, क्रेडिट कार्ड पेमेंट, वाहन कर्ज, वैयक्तिक कर्ज आणि कंझम्पशन लोन यांचा समावेश आहे.
७००० कोटींचा भार
ज्यांनी २९ फेब्रुवारी २०२० पर्यंत कर्जाचे हप्ते नियमितपणे फेडले आहेत अशा लोकांना या योजनेचा फायदा मिळेल. अर्थ मंत्रालयाच्या माहितीनुसार ही सुविधा १ मार्च २०२० ते ३१ ऑगस्ट २०२० पर्यंतच्या कर्जस्थिगिती योजनेवरच मिळेल. यामुळे सरकारी तिजोरीवर ७००० कोटी रुपयांचा भार पडणार आहे.
जर एखाद्या कर्जदाराने कर्जस्थगिती योजनेचा फायदा घेतला नाही आणि कर्जाचा हप्ता वेळेत भरला आहे, अशांनाही बँकेकडून ‘कॅशबॅक’ मिळेल, असे देखील सरकारने स्पष्ट केले आहे. या योजनेअंतर्गत या कर्जदारांना सहा महिन्यांचे साधारण व्याज आणि चक्रवाढ व्याजाच्या फरकाइतकी रक्कम परत मिळणार आहे.