किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलश्री काशी विश्वनाथ धामचा लोकार्पण सोहळा,
वाराणसी, १२ डिसेंबर – देशाचे पंतप्रधान आणि वाराणसीचे खासदार झाल्यापासून नरेंद्र मोदी यांनी श्री काशी विश्वनाथ धाम जुन्याच पारंपरिक वैभवाने थाटात पुन्हा उभे राहावे, हे स्वप्न पाहिले. आता श्री काशी विश्वनाथ धामचा कायाकल्प झाला असून, उद्या सोमवारी होणार्या लोकार्पण सोहळ्यासाठी श्रीकाशी विश्वेश्वर नगरी सज्ज झाली आहे.
स्वत: पंतप्रधान मोदी या भव्य-दिव्य सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधानांचे हे स्वप्न साकार होताना पाहण्यासाठी आणि हा अनुभव प्रत्यक्ष घेण्यासाठी देशभरातून भाजपाशासित राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आणि राज्यपाल आदी येत आहेत. पंतप्रधान या सर्वांसोबत नौकाविहार करणार असून, काशीतील प्रसिद्ध गंगा आरती पाहणार आहेत. या अनुषंगाने गंगा नदीत सुरक्षेचा कडेकोट बंदोबस्त राहणार आहे. पंतप्रधानांसह अतिविशिष्ट मान्यवरांच्या सुरक्षेसाठी गंगेच्या पात्रातच मार्ग तयार करण्यात आला आहे.
देशभर थेट प्रसारण
दरम्यान, या कार्यक्रमाचे भाजपाच्या वतीने देशभर थेट प्रसारण दाखविले जाणार आहे. भाजपाच्या सर्व मंडळांतील मंदिरांमध्ये हे थेट प्रसारण पाहण्याची व्यवस्था केली जाणार आहे.
कडेकोट सुरक्षा
श्री काशी विश्वेश्वर मंदिराच्या ज्या मार्गाने पंतप्रधानांचा ताफा जाईल, तेथील दुकाने सुरू राहतील पण, कोणालाही छतावरून पुष्पवृष्टी करण्याची परवानगी राहणार नाही. पंतप्रधानांच्या सुरक्षेची जबाबदारी २२ आयपीएस अधिकार्यांना देण्यात आली आहे. विमानतळावर २०० पोलिस तैनात राहणार आहेत. या कार्यक्रमाची रंगीत तालिमही घेण्यात आली.
महाप्रसादाच्या पंगतीत मोदी बसणार
मुख्य कार्यक्रमादरम्यान श्री काशी विश्वनाथ बाबांचा अभिषेक होऊन महानैवेद्य अर्पण केला जाणार आहे. या कामासाठी भाजपाचे कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत. स्वत: मोदी या महाप्रसादाच्या पंगतीत बसणार असल्याचे समजते. हा प्रसाद आठ लाख कुटुंबांपर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था केली जाणार आहे.
काशीनगरी फुलांनी सजविणार
मंदिर परिसरालाच नव्हे तर संपूर्ण काशीनगरीला फुलांनी सजविण्यात येत असून, घरोघरी दिवाळीसारखा उत्सव साजरा केला जाणार आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, या सोहळ्याच्या थेट प्रक्षेपणाची व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी विविध वृत्तवाहिन्या समोर आल्या आहेत.
साधू-संतांनाही गेले निमंत्रण
या कार्यक्रमासाठी महिनाभर आधीच हजारो साधु-संतांना पंतप्रधान मोदींच्या वतीने निमंत्रण पत्रे पाठविण्यात आली आहेत. त्यामुळे सोमवारी काशीनगरीत साधू-संतांसोबतच अनेक सामाजिक, धार्मिक संस्था, संघटनांचे प्रतिनिधी यांचीही मांदियाळी राहणार आहे.