किमान तापमान : 24.42° से.
कमाल तापमान : 25.99° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 41 %
वायू वेग : 3.09 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
25.99° से.
23.29°से. - 28.55°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर घनघोर बादल23.28°से. - 28.56°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.22°से. - 28.61°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.05°से. - 26.8°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर साफ आकाश22.52°से. - 27.89°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर घनघोर बादल22.33°से. - 26.62°से.
रविवार, 01 डिसेंबर टूटे हुए बादल– जामिनावरील सुनावणीपूर्वीच धक्का,
नवी दिल्ली, (९ मार्च) – दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या अडचणी वाढल्या आहेत. उत्पादन शुल्क घोटाळा प्रकरणात तिहार तुरुंगात आठ तास चौकशी केल्यानंतर अंमलबजावणी संचालनालय अर्थात् ईडीने त्यांना गुरुवारी अटक केली. सिसोदिया यांच्या जामिनावर उद्या शुक‘वारी येथील न्यायालयात सुनावणी होणार होती. मात्र, त्यापूर्वीच ईडीने अटक करून त्यांना धक्का दिला आहे. ईडी दोन दिवसांपासून सिसोदिया यांची चौकशी करीत आहे. ईडीच्या अधिकार्यांनी 7 मार्च रोजी सिसोदियांची जवळपास सहा तास चौकशी केली होती. त्यानंतर आजही त्यांची चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान समाधानकारक उत्तरे न दिल्याने सिसोदिया यांना ईडीने अटक केली, अशी माहिती सूत्रांनी दिली. ईडीच्या कारवाईनंतर संतप्त झालेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपावर टीका केली.
सिसोदिया यांची तिहार तुरुंगात चौकशी करण्यासाठी ईडीने न्यायालयाची परवानगी मागितली होती. सिसोदिया यांचे बयाण नोंदवून घेण्यासाठी न्यायालयाने ईडीला तीन दिवसांचा अवधी दिला होता. उत्पादन शुल्क घोटाळा प्रकरणात ईडीने 22 ऑगस्ट 2022 रोजी गुन्हे दाखल केले होते. याच प्रकरणात सीबीआयदेखील सहा महिन्यांपासून तपास करीत असून, सीबीआयने त्यांना अटक केली आहे.
सीबीआयला पुरावे सापडले नाही : केजरीवाल
मनीष सिसोदिया यांना पहिले सीबीआयने अटक केली. या तपास यंत्रणेला कोणतेही पुरावे सापडले नाहीत. छापेमारीत पैसाही सापडला नाही. त्यांच्या जामिनावर उद्या शुक्रवारी सुनावणी आहे. उद्या मनीष सुटले असते. मात्र, ईडीने आजच त्यांना अटक केली. मनीष यांना कोणत्याही परिस्थितीत तुरुंगात ठेवण्याचा त्यांचा उद्देश आहे. रोज नवीन बनावट प्रकरणे तयार केली जातात. नागरिक पाहत आहेत. ते उत्तर देतील, अशी टीका अरविंद केजरीवाल यांनी भाजपावर केली आहे.
सिसोदिया सुटणार तुम्हाला कसे माहीत : भाजपा
अरविंद केजरीवाल यांनी केलेल्या ट्विटच्या मुद्यावर भाजपाने त्यांना प्रत्युत्तर दिले. उद्या मनीष सुटतील, हे तुम्हाला पहिलेपासून कसे काय माहीत आहे, या वक्तव्याचा काय अर्थ आहे, असा प्रश्न भाजपाचे प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी ट्विट करीत विचारले. केजरीवालांनी ‘व्हिक्टिम कार्ड’ खेळणे बंद करावे. केजरीवाल यांनी असाच प्रकार सत्येंद्र जैन यांच्यावेळीही केला होता. कोणताही पुरावा नसताना ईडीने जैन यांच्यावर कारवाई केली, असे तुम्ही म्हटले होते. मात्र, न्यायालयाने मागील नऊ महिन्यांपासून सत्येंद्र जैन यांना तुरुंगात ठेवले आहे, असे पूनावाला यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.