किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलनवी दिल्ली, (२७ ऑक्टोबर) – दिव्यांगांसाठीच्या आशियाई क्रीडास्पर्धेत भारताने मिळवलेल्या विक्रमी ७३ पदके आणि पदतालिकेतील स्थानाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे. जकार्तामधे २०१८ साली झालेल्या स्पर्धेत भारताने ७२ पदके जिंकली होती. तो टप्पा आता आपण मागे टाकला आहे. दिव्यांग खेळाडूंच्या बांधिलकी, दृढता आणि अतूट प्रयत्नांचेही पंतप्रधानांनी कौतुक केले.
एक्स वरिल आपल्या संदेशात पंतप्रधान म्हणाले: दिव्यांगांसाठीच्या आशियाई क्रीडास्पर्धेत भारताने अभूतपूर्व ७३ पदके मिळवत, विजयी घोडदौड कायम राखली आहे. जकार्ता २०१८ दिव्यांगांसाठीच्या आशियाई क्रीडास्पर्धेतील आपला ७२ पदकांचा पूर्वीचा विक्रम मोडून काढत एक अभूतपूर्व कामगिरी केली आहे!
हा महत्त्वपूर्ण क्षण आपल्या खेळाडूंच्या अथक निर्धाराला मूर्त रूप देत आहे. आपल्या असामान्य दिव्यांग खेळाडूंसाठी जल्लोषपूर्ण मानवंदना. त्यांनी इतिहासात आपले नाव कोरले असून प्रत्येक भारतीयाचे हृदय प्रचंड आनंदाने भरून गेले आहे. त्यांची बांधिलकी, दृढता आणि उत्कृष्टतेचा निर्धारपूर्ण प्रयत्न हे खरोखरच प्रेरणादायी आहेत! ही ऐतिहासिक कामगिरी भविष्यातील पिढ्यांना प्रेरणादायी, मार्गदर्शक दीपस्तंभ म्हणून काम करेल.