किमान तापमान : 24.72° से.
कमाल तापमान : 28.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 51 %
वायू वेग : 6.9 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
28.99° से.
23.71°से. - 28.99°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.24°से. - 25.52°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.44°से. - 26.98°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश24.12°से. - 25.88°से.
बुधवार, 15 जानेवारी कुछ बादल24.11°से. - 25.32°से.
गुरुवार, 16 जानेवारी छितरे हुए बादल23.75°से. - 26.28°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादल– प्रत्येक विजयी खेळाडूचा नावानिशी स्वतंत्र ट्विट करून केले अभिनंदन,
नवी दिल्ली, (२६ ऑक्टोबर) – आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा २०२२ मधील विजेत्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे. विशेषतः प्रत्येक विजयी खेळाडूचा नावानिशी स्वतंत्र ट्विट करून अभिनंदन केले आहे. पंतप्रधानांनी एक्स वर अभिनंदनाच्या पोस्ट केल्या आहेत. चीनमधील हांगझोऊ येथे आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा २०२२ सुरू आहेत.
यात बॅडमिंटन महिला एकेरी एसएल ३ मध्ये कांस्य पदक मिळवल्याबद्दल मानसी जोशी, एसएल ३ -एसयू ५ प्रकारातील मिश्र बॅडमिंटन स्पर्धेत प्रमोद भगत आणि मनीषा रामदास यांनी कांस्य पदक जिंकल्याबद्दल, बॅडमिंटन मिश्र दुहेरी डङ३-डण५ स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल नितेश कुमार आणि तुलसीमाथी मुरुगेसन याचे, पुरुष दुहेरी रिकर्व्ह स्पर्धेत तिरंदाज हरविंदर सिंग आणि साहिल यांनी कांस्य पदक जिंकल्याबद्दल, पुरुषांच्या भालाफेक-एफ ३७ स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल हॅनीचे, टेबल टेनिस महिला एकेरी – श्रेणी ४ प्रकारात कांस्य पदक जिंकल्याबद्दल भाविना पटेलचे, पुरुषांच्या २०० मीटर धावण्याच्या शर्यतीत ढ३५ प्रकारात कांस्य पदक पटकावल्याबद्दल नारायण ठाकूरचे, पुरुषांच्या २०० मीटर टी ३७ स्पर्धेत कांस्यपदक पटकावल्याबद्दल श्रेयांश त्रिवेदीचे, पुरुष भालाफेक एफ ६४ प्रकारात सुवर्णपदक पटकावत जागतिक विक्रम केल्याबद्दल सुमित अंतिलचे, पुरुषांच्या थाळी फेक प्रकारात कांस्यपदक जिंकल्याबद्दल मुथुराजाचे, पुरुषांच्या ६५ किलो वजनी गटात भारत्तोलन क्रीडा प्रकारात कांस्यपदक जिंकल्याबद्दल अशोक यांचे, भालाफेक ऋ४६ स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल सुंदर सिंग गुर्जर चे, भालाफेक ऋ४६ स्पर्धेत रौप्य पदक जिंकल्याबद्दल रिंकूचे, भालाफेक प्रकारात कांस्य पदक मिळवल्याबद्दल अजित सिंगचे, बॅडमिंटन महिला एकेरी स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल वैष्णवी पुनेयानीचे, शॉटपुट ऋ-५६/५७ प्रकारात कांस्यपदक जिंकल्याबद्दल होतोझे देना होकाटो चे, महिलांच्या लांब उडी ढ४७ स्पर्धेच्या अंतिम फेरीत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल निमिषाचे, बॅडमिंटन एसएल ३ खेळ प्रकारात महिला एकल मध्ये कांस्य पदक जिंकल्याबद्दल मनदीप कौरचे, पुरुषांच्या डिस्कस थ्रो (थाळीफेक) क्रीडा प्रकारात रौप्यपदक जिंकल्याबद्दल योगेश कथुनियाचे, महिलांच्या पॅरा पॉवरलिफ्टिंग च्या ६१ किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावल्याबद्दल झैनब खातूनचे, महिला पॅरा पॉवरलिफ्टिंग ६१ किलो वजनी गटाच्या स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल राज कुमारीचे, महिला दुहेरी कंपाऊंड स्पर्धेत रौप्य पदक जिंकल्याबद्दल भारतीय नेमबाज शीतल देवी आणि सरिता यांचे, पुरुषांच्या १५०० मीटर – टी ११ अंतिम स्पर्धेत सुवर्णपदक पटकावल्याबद्द अंकुर धामाचे, टेबल टेनिस पुरुष एकेरी – श्रेणी १ प्रकारात कांस्य पदक मिळवल्याबद्दल संदीप डांगीचे, पुरुषांच्या भालाफेक ऋ६४ प्रकारात कांस्यपदक पटकावल्याबद्दल पुष्पेंद्र सिंगचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.