किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलनवी दिल्ली, (०७ सप्टेंबर) – उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माच्या विरोधात केलेल्या वक्तव्यावर तथ्यांची मांडणी करीत सडेतोड उत्तर द्या, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंत्र्यांना दिला. त्यांनी या बैठकीत मंत्र्यांना दोन संदेश दिले. इंडिया विरुद्ध भारतच्या वादात अनावश्यक वक्तव्ये करणे टाळा. ज्यांना बोलण्याचा अधिकार दिला त्यांनीच केवळ बोलावे, असे मोदी यांनी स्पष्ट केले.
जी-२० परिषदेसाठी सर्वच मंत्र्यांनी राजधानीत उपस्थित राहावे. विदेशातील राष्ट्रप्रमुख आणि प्रतिनिधी मंडळांसोबत राहण्याची जबाबदारी नसलेल्या मंत्र्यांनी संबंधित देशांची संस्कृती, राहणीमान, खाद्यसंस्कृती यासारखी पायाभूत माहिती पहिलेच घेऊन ठेवावी, असा सल्लाही त्यांनी मंत्र्यांना दिला. उदयनिधी यांनी केलेल्या सनातन धर्माबाबतच्या वक्तव्याचा मुद्दा भाजपा उचलणार असल्याचे मोदी यांनी मंत्र्यांना दिलेल्या सल्ल्यावरून स्पष्ट झाले आहे.
या वक्तव्यावर भाजपासह धर्मगुरूंनीही उदयनिधी स्टॅलिन यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. उदयनिधींच्या वक्तव्यावरून ‘इंडिया’ आघाडीवरही सवाल उपस्थित केला. स्टॅलिन यांचा द्रमुक पक्ष ‘इंडिया’ आघाडीचा घटक आहे. धर्माच्या विरोधात अशा प्रकारची वक्तव्ये करू नयेत, असे भाजपा आणि धर्मगुरूंचे म्हणणे आहे. या मुद्यावर चौफेर हल्ले झाल्यानंतर काँग्रेससह इतर पक्षांनी उदयनिधीच्या वक्तव्यापासून स्वतःला दूर ठेवले आहे. मात्र, उदयनिधी आपल्या वक्तव्यावर ठाम आहे.
कार्यक्रम स्थळावर बसने जावे
जी-२० परिषदेच्या संदर्भात नरेंद्र मोदी यांनी मंत्र्यांसोबत चर्चा केली. शनिवारी रात्री आयोजित केलेल्या भोजन कार्यक‘मात सहभागी होणार्या मंत्र्यांनी आपल्या वाहनांनी संसद परिसरात यावे आणि त्यानंतर बसमध्ये सोबत कार्यक्रमाच्या स्थळापर्यंत जावे, असे मोदी यांनी मंत्र्यांना सांगितले. या कार्यक्रमात सहभागी होणारे मुख्यमंत्रीही संसद भवनात पोहोचतील व त्यानंतर बसने जाणार आहेत. या कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री आणि मुख्यमंत्र्यांना सायंकाळी ५.५० पर्यंत संसद भवन परिसरात दाखल व्हायचे आहे आणि त्यानंतर ६.३० वाजेपर्यंत कार्यक्रम स्थळापर्यंत पोहोचायचे आहे.