किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलबंगळुरू, (२४ सप्टेंबर) – चांद्रयान-३ आणि आदित्य एल-१ च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर जगभरातील नावाजलेल्या अंतराळ संशोधन संस्थांचे लक्ष इस्रोने आपल्याकडे खेचले आहे. इस्रोकडे आता अनेक महत्त्वाच्या मोहिमा आहेत. याशिवाय इस्रो अन्य अंतराळ संस्थांनी विकसित केलेले यान देखील प्रक्षेपित करणार आहे. यापैकीच बिकिनी ही एक महत्त्वाची मोहीम आहे. बिकिनी एक युरोपियन अंतराळ यान आहे, जे पुढील वर्षी इस्रोच्या पीएसएलव्ही रॉकेटने अंतराळात प्रक्षेपित करण्यात येणार आहे. हे यान अतिशय बारीक आणि पातळ आहे. हे यान युरोपियन स्टार्टअप द एक्सप्लोरेशन कंपनीचे री-एन्ट्री व्हेईकल आहे. बिकिनी हे कंपनीच्या री युजेबल री-एन्ट्री मॉड्युलर निक्सचे छोटे व्हर्जन आहे.
या मिशन अंतर्गत बिकिनीला सुमारे ५०० किलोमीटर अंतरावर रॉकेटद्वारे पीएस-४ सह सोडले जाणार आहे. पीएस ४ नंतर बिकिनी डिबुस्ट करून कक्षा सोडेल. ते १२० किंवा १४० किलोमीटर उंचीवर पोहोचल्यानंतर तो बिकिनीला अंतराळात सोडेल. तेथून बिकिनी थेट समुद्रात पडेल. इस्रोचे पीएसएलव्ही रॉकेट बिकिनीला घेऊन पृथ्वीच्या पृष्ठभागापासून ५०० किलोमीटरपर्यंत वर नेऊन सोडणार आहे, जेथून हे यान पुन्हा पृथ्वीवर परतेल. यादरम्यान त्याच्या पुन्हा प्रवेशाबाबत अनेक तपासण्या केल्या जातील. ते वातावरण ओलांडून समुद्रात पडेल. बिकिनीचे वजन फक्त ४० किलो आहे. त्याचा उद्देश अंतराळात वितरण (डिलिवरी) करणे हा आहे. बिकिनी जानेवारीच्या री-एंट्रीमध्ये यशस्वी झाले, तर ते व्यावसायिक उड्डाणांच्या नवीन जगाचे दरवाजे उघडेल. म्हणजे अंतराळात कोणतीही उपकरणे स्वस्तात पोहोचवता येतील.