किमान तापमान : 25.33° से.
कमाल तापमान : 25.99° से.
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 53 %
वायू वेग : 8.5 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
25.99° से.
23.58°से. - 26.11°से.
शुक्रवार, 24 जानेवारी टूटे हुए बादल23.36°से. - 27.01°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश24.95°से. - 27.79°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.46°से. - 28.06°से.
सोमवार, 27 जानेवारी साफ आकाश25.51°से. - 27.86°से.
मंगळवार, 28 जानेवारी कुछ बादल25.2°से. - 26.87°से.
बुधवार, 29 जानेवारी कुछ बादलभारतीय लष्कर सतर्क,
नवी दिल्ली, २१ जुलै – उत्तराखंडातील बाराहोटी परिसरातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पीपल्स लिबरेशन आर्मीच्या हालचाली मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. मागील सहा महिन्यांपासून चिनी भागात या हालचाली वाढल्या असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या हालचाली पाहता, भारतीय लष्कर सतर्क झाले आहे.
बाराहोटीजवळील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर अलिकडेच पीपल्स लिबरेशन आर्मीच्या ४० सैनिकांचे पथक गस्त घालताना दिसून आले होते. दीर्घकाळानंतर या परिसरात चिनी सैनिक दिसून आले, अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली. उत्तराखंडातील या हालचाली पाहता, भविष्यात चीन मोठी तयारी करण्याची शक्यता आहे. त्यामुळे या परिस्थितीला तोंड देण्याची तयारी भारतीय लष्कराने केली आहे, असे सूत्रांनी सांगितले.
बाराहोटीजवळ असलेल्या वायुतळावरील चिनी हालचालींना देखील वेग आला आहे. या वायुतळावर कित्येक ड्रोन्स आणि हेलिकॉप्टर्स सक्रिय झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
उत्तराखंडात लडाखप्रमाणे स्थिती उद्भवू नये, म्हणून भारतीय लष्कराची पथके या भागात मागील वर्षी तैनात करण्यात आली होती. भारताने मध्यवर्ती क्षेत्रात अतिरिक्त सैन्य तैनात केले असून, राखीव ठेवण्यात आलेले सैन्यही या भागात पाठविण्यात आले, अशी माहिती सूत्रांनी दिली. मागील वर्षी मे महिन्यापासून लडाखमध्ये दोन्ही सैन्य समोरासमोर आले. त्यानंतर पेंगॉंग त्सो सरोवराच्या उत्तर आणि दक्षिण किनार्यावरून दोन्ही देशांच्या लष्कराने फेब्रुवारीत माघार घेतली आहे.