किमान तापमान : 27.71° से.
कमाल तापमान : 27.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 51 %
वायू वेग : 4.28 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.99° से.
27.79°से. - 30.66°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.54°से. - 30.53°से.
रविवार, 17 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.6°से. - 29.96°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.44°से. - 30.51°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.94°से. - 29.99°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.27°से. - 30.16°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश– गौतम अदानी यांनी केली घोषणा,
नवी दिल्ली, (०८ जानेवारी) – सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाल्यानंतर गौतम अदानी अॅक्शन मोडमध्ये आहेत. अदानी समूहाच्या मालकीच्या एसीसी लिमिटेडने सोमवारी एशियन काँक्रिट आणि सिमेंट्स प्रायव्हेट लिमिटेडमधील उर्वरित ५५% हिस्सा खरेदी करण्याची घोषणा केली. या स्टेकची किंमत ४२५.९६ कोटी रुपये आहे. एसीसीकडे कंपनीत आधीच ४५ टक्के हिस्सा आहे. अशाप्रकारे, एसीसीची आता एसीसीपीएलमध्ये १०० टक्के भागीदारी आहे. एशियन काँक्रीट आणि सिमेंटचा हिमाचल प्रदेशातील नालागढ येथे १३ लाख टन वार्षिक क्षमतेचा कारखाना आहे. त्याची उपकंपनी एशियन फाईन सिमेंट प्रा. ली. चा पंजाबमधील राजपुरा येथे वार्षिक १५ लाख टन क्षमतेचा प्लांट आहे. अदानी समूहाने गेल्या वर्षी एसीसीचे अधिग्रहण पूर्ण केले. गौतम अदानी यांचा मुलगा करण अदानी हा व्यवसाय पाहत आहे.
स्टॉक एक्स्चेंजला दिलेल्या माहितीत एसीसीने सांगितले की, कंपनीच्या बोर्डाने ८ जानेवारी रोजी झालेल्या बैठकीत एसीसीपीएलच्या खरेदीला मान्यता दिली होती. एसीसी लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कपूर म्हणाले, ’या संपादनासह आम्ही आमचा विकासाचा मार्ग पुढे चालू ठेवत आहोत. आमचा पोर्टफोलिओ समृद्ध करणे आणि आमच्या सर्व भागधारकांसाठी मूल्य निर्मितीच्या दिशेने आमच्या प्रवासाला गती देणे. सोमवारी, एसीसी लिमिटेडचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजमध्ये ०.८९ टक्के किंवा २१.१० रुपयांच्या घसरणीसह २३५६.२५ रुपयांवर व्यवहार करताना दिसले. या शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांक २४८६.३५ रुपये आहे. सध्या बीएसईवर कंपनीचे एम-कॅप ४४,२४७.३७ कोटी रुपये होते.