किमान तापमान : 29.03° से.
कमाल तापमान : 31° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 60 %
वायू वेग : 5.31 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
31° से.
27.43°से. - 31.99°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल28.11°से. - 29.65°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल28.11°से. - 30.16°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.62°से. - 31.24°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश27.06°से. - 30.11°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.3°से. - 30.22°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाशनवी दिल्ली, (१७ फेब्रुवारी ) – तुर्कस्तानमध्ये आलेल्या विनाशकारी भूकंपात मदतीसाठी गेलेले एनडीआरएफ चे पथक मायदेशी परतले आहे. तुर्कीतील अदाना विमानतळावर तेथील कर्मचार्यांनी टाळ्या वाजवून भारतीय बचाव पथकाचे आभार मानले. यानंतर भारतात पोहोचल्यावर गाझियाबादमधील अधिकार्यांनी एनडीआरएफ टीमच्या सदस्यांचे स्वागत केले.
तुर्कस्तानमध्ये ऑपरेशन दोस्त राबवून एक टीम आज गाझियाबाद एनडीआरएफ बटालियनमध्ये पोहोचली आहे. तीथे त्यांचे मेडिकल केल्यानंतर दुपारचे जेवण करून ते घरी जातील. तर दुसरा संघ आज संध्याकाळी येईल आणि तिसरा संघ उद्या परत येईल. भूकंपग्रस्त तुर्कीमध्ये १० दिवसांच्या बचाव मोहिमेनंतर श्वान पथकातील सदस्य रॅम्बो आणि हनी यांच्यासह एनडीआरएफचे ४७ सदस्यीय पथक आज भारतात परतले.
तुर्कस्तान-सीरियातील भूकंपात आतापर्यंत ४१ हजारांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. भूकंपानंतर जगभरातील सर्व देशांनी तुर्कस्तानला मदतीचा हात पुढे केला. तुर्कस्तान आणि सीरियामध्ये हाहाकार माजवणार्या भूकंपातील मृतांचा आकडा थांबण्याचे नाव घेत नाहीये. आज म्हणजेच शुक्रवारी हा आकडा ४१,००० च्या पुढे गेला आहे. एकट्या तुर्कस्तानमध्ये आतापर्यंत ३८,०४४ लोकांनी आपला जीव गमावला आहे. भूकंपानंतर भारतासह जगभरातील देश तुर्कस्तानच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. संयुक्त राष्ट्रांनी शुक्रवारी मानवतावादी संकटाचा सामना करण्यासाठी १०० दशलक्ष मदतीचे आवाहन केले.