किमान तापमान : 23.32° से.
कमाल तापमान : 23.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 46 %
वायू वेग : 4.32 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.99° से.
22.49°से. - 25.53°से.
रविवार, 12 जानेवारी साफ आकाश23.62°से. - 27.14°से.
सोमवार, 13 जानेवारी कुछ बादल24.17°से. - 25.97°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश24.12°से. - 25.55°से.
बुधवार, 15 जानेवारी छितरे हुए बादल23.64°से. - 26°से.
गुरुवार, 16 जानेवारी छितरे हुए बादल24.67°से. - 27.56°से.
शुक्रवार, 17 जानेवारी टूटे हुए बादल– झिगझॅग लिहिणं लगेच बंद करा : हायकोर्टाचा डॉक्टरांना निर्देश,
नवी दिल्ली, (०९ जानेवारी) – डॉक्टरांची अक्षरं हा नेहमीच विनोदाचा विषय असतो. पण, डॉक्टरांची अक्षरं न समजल्यामुळे एखाद्याला चुकीचे औषध दिले जाऊन त्याचा जीव जात असेल तर ? वेडीवाकडी नक्षी किंवा शाईत बुडालेला मुंगळा कागदावर चालल्यासारखी डॉक्टरांची अक्षरे ही आपल्यासाठी अगदी सामान्य बाब आहे. मात्र, या प्रकाराची गंभीर दखल घेत, ओदिशा उच्च न्यायालयाने डॉक्टरांना कठोर शब्दांत निर्देश देत, कॅपिटल अक्षरात प्रिस्क्रीप्शन लिहिण्याचे निर्देश दिले आहेत.
डेंकनाल जिल्ह्यातील हिंडोल येथील रसनंद भोई यांचा मोठा मुलगा सौवाग्या रंजन भोई याला साप चावला. त्याच्या प्रिस्क्रीप्शनवर लिहिलेल्या औषधाचे नाव वाचताना अडचण झाली आणि त्याच्यावर वेळेत उपचार होऊ शकले नाहीत. यातच, सौवाग्याचा मृत्यू झाला. मुलाच्या मृत्यूनंतर भोई कुटूंबियांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने हा आदेश दिला आहे. डॉक्टरांनी प्रिस्क्रीप्शन लिहिताना स्पष्ट हस्ताक्षर वापरावं, ज्यामुळे औषधांच्या नावे सर्वसामान्यांनाही वाचता येतील आणि कोणतीही संदिग्धता राहणार नाही, असं न्यायालयाने आदेशात स्पष्ट केलं आहे. न्यायालयाने या विषयावर आपले मत मांडताना सांगितलं की, सर्वसामान्यांना जणू ते नक्षीकाम वाटतं. डॉक्टरांचं झिग-झॅग लिखाण समजणं, हा एक टास्क आहे. पण, आता हे ‘झिग-झॅग’ लिहिणं बंद करा, असा आदेश उच्च न्यायालयाने दिला.
ओडिशा उच्च न्यायालयाने राज्यातील सर्व डॉक्टर आणि खासगी रुग्णालयांना हा महत्त्वपूर्ण निर्देश जारी केला असून, आता डॉक्टरांना औषधे लिहून देताना, स्पष्ट आणि सुवाच्य अक्षरात किंवा कॅपिटल अक्षरात लिहावी लागतील. राज्यातील सर्व डॉक्टर, खाजगी रुग्णालये आणि वैद्यकीय केंद्रांना यापुढे सर्व प्रिस्क्रीप्शन, पोस्टमार्टम अहवाल आणि वैद्यकीय-कायदेशीर कागदपत्रे स्पष्ट आणि सुवाच्य हस्तलिखितात किंवा मोठ्या म्हणजे इंग्रजी कॅपिटल अक्षरात लिहिण्याचे निर्देश दिले आहेत. न्यायमूर्ती एस.के. पाणिग्रही यांनी मुख्य सचिवांना या आदेशाची प्रत सर्व वैद्यकीय केंद्रे, खाजगी दवाखाने आणि वैद्यकीय महाविद्यालयांना पाठवण्याचे निर्देश दिले आहेत.
उच्च न्यायालयाने म्हटलं की, डॉक्टरांमध्ये झिग-झॅग हस्ताक्षराचा टड्ढेंड बनला असून सामान्य व्यक्ती आणि न्यायव्यवस्थेलाही कागदपत्रे वाचणं कठीण होतं. उच्च न्यायालयाच्या या नवीन आदेशामुळे आरोग्य सेवा क्षेत्रात सुधारणा, कागदपत्रे वाचणे आणि समजणं सोपे होईल, याची खात्री होईल. अनेक प्रकरणांमध्ये, शवविच्छेदन अहवाल लिहिताना बहुतेक डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे वैद्यकीय-कायदेशीर कागदपत्रांचा मजकूर समजून घेताना, न्यायालयालाही वाचणे कठीण जात असल्याचे न्यायालयाने सांगितले.