किमान तापमान : 29.43° से.
कमाल तापमान : 29.99° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 54 %
वायू वेग : 1.77 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
29.99° से.
27.63°से. - 29.99°से.
रविवार, 17 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.9°से. - 30.84°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.76°से. - 30.97°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.93°से. - 30.63°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.46°से. - 30.16°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर कुछ बादल26.12°से. - 29.61°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर साफ आकाश– चीनला चोख प्रत्यूत्तर देण्यासाठी मोदींचे मोठे पाऊल,
नवी दिल्ली, (१५ फेब्रुवारी ) – चीनचे सैन्य यापुढे अरुणाचल प्रदेश ते लडाखपर्यंतच्या भारत-चीन सीमेवर पाऊल ठेवू शकणार नाही. चीनला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या इतिहासातील आतापर्यंतचा सर्वांत मोठा निर्णय घेतला आहे. देशाच्या सीमा मजबूत करण्यासाठी व्हायब्रंट व्हिलेज कार्यक्रमाला सरकारने मान्यता दिली आहे. चीन सीमेवर सैन्य तैनात करण्यासाठी भारत-तिबेट सीमा पोलिसांच्या सात नवीन बटालियनची स्थापना केली जाणार आहे.
या कार्यक्रमांतर्गत देशाच्या उत्तर सीमेवर वसलेल्या गावांमध्ये पायाभूत सुविधांचा विकास केला जाणार आहे. यासाठी ४८०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या बैठकीतील निर्णयांची माहिती देताना केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, लडाख, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशच्या एकूण १९ जिल्ह्यांतील २९६६ गावांमध्ये रस्ते आणि इतर पायाभूत सुविधा मजबूत केल्या जाणार आहे. हा सीमा क्षेत्र विकास कार्यक्रमापेक्षा वेगळा असेल तसेच यासाठी लागणारा संपूर्ण खर्च केंद्र सरकार करणार आहे.
सिंकुलना बोगद्याच्या बांधकामाला मंजुरी
मंत्रिमंडळाच्या बैठकीत सिंकुलना बोगद्याच्या बांधकामालाही मंजुरी देण्यात आली आहे. या बोगद्याची लांबी ४.८ किमी असणार असून, त्याच्या निर्मितीसाठी १६०० कोटी रुपये खर्च होणार आहेत. चीन सीमेवर नजर ठेवण्यासाठी आयटीबीपी सात नवीन बटालियन तयार करणार आहे. यासोबतच ऑपरेशनल बेस तयार करण्यात येणार असल्याचे ठाकूर यांनी सांगितले.
दोन लाख पतसंस्था उभारणार
देशातील सहकारी चळवळ मजबूत करण्यास आणि तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी सरकार सहकारी संस्थांना बळकट केले जाणार आहे. याअंतर्गत पुढील पाच वर्षांत दोन लाख प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्था, दुग्धव्यवसाय, मत्स्यपालन सहकारी संस्था स्थापन करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.