किमान तापमान : 26.47° से.
कमाल तापमान : 27.48° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 55 %
वायू वेग : 5.08 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.48° से.
24°से. - 28.42°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर घनघोर बादल23.61°से. - 28.82°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर घनघोर बादल24.07°से. - 28.75°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.01°से. - 28.78°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर घनघोर बादल23.12°से. - 27.87°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर घनघोर बादल22.59°से. - 28.12°से.
रविवार, 01 डिसेंबर छितरे हुए बादल– केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा सल्ला,
नवी दिल्ली, (१० मार्च) – गर्दीच्या ठिकाणी मुखाच्छादन वापरत नसाल तर सावधान, कारण गर्दीच्या ठिकाणी मुखाच्छादन न वापरल्यास किंवा ते काढल्यास तुम्हाला इन्फ्लुएन्झाचा धोका निर्माण होऊ शकतो. फ्लूच्या रुग्णांमध्ये अचानक वाढ झाली आहे. गेल्या सहा महिन्यांत फ्लूचे रुग्ण २०० टक्क्यांनी वाढले आहेत. कोरोना बाधितांची संख्या कमी होत असली तरी, एच३एन२ इन्फ्लुएन्झाच्या विषाणूमुळे ताप आणि सर्दी-खोकल्याच्या रुग्णांत वाढ झाली आहे. तेव्हा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देशात पुन्हा एकदा मुखाच्छादन वापरण्याचा सल्ला दिला आहे.
कोरोनासदृश इन्फ्लुएन्झा देशातील काही राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर रुग्णांची संख्या वाढवत आहे. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत असून, विविध प्रकारची लक्षणे दिसू लागली आहेत. कर्नाटक तसेच उत्तरप्रदेशातील कानपूर आणि लखनौमध्ये इन्फ्लुएन्झाच्या रुग्णांमध्ये अचानक वाढ झाली आहे. महाराष्ट्रालाही दक्षता घेण्याचा इशारा देण्यात आला आहे. आता महाराष्ट्रात पाऊस आणि वातावरणातील बदलामुळे या विषाणूचा धोका वाढू शकतो, असे म्हटले आहे.