किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादल-अमेरिकन खासदाराचे मोठे विधान,
नवी दिल्ली, (२८ फेब्रुवारी ) – नुकतेच अमेरिकन सिनेटर्सचे शिष्टमंडळ भारत, पाकिस्तान, जर्मनी आणि इस्रायलला भेट देऊन अमेरिकेत परतले आहे. अमेरिकेचे वरिष्ठ सिनेटर चक शूमर यांनी या शिष्टमंडळाचे नेतृत्व केले. ते म्हणाले की, चीनविरुद्ध भागीदार म्हणून अमेरिकेला आवश्यक असलेल्या भूमिकेसाठी भारत योग्य आहे. चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या हुकूमशाही विरोधात पंतप्रधान मोदींनी जगातील दोन सर्वात मोठ्या लोकशाही देशांसोबत काम करण्याची गरजही व्यक्त केली असल्याचा दावा शूमर यांनी केला आहे.
चक शूमर म्हणाले, आम्ही भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक महत्त्वाचा संदेश दिला आहे, ज्यामध्ये भारत आणि अमेरिकेने चीनविरोधात एकमेकांना साथ देण्याची गरज असल्याचे सांगण्यात आले. भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे आणि भारत हा अतिशय तरुण देशही आहे त्याचबरोबर आगामी काळात तो वेगाने विकसित होईल. मी पंतप्रधान मोदींना सांगितले की, जर या शतकात आपल्या लोकशाहीचा एकत्रितपणे विकास करायचा असेल तर आपल्याला एकत्र काम करावे लागेल. आपल्याला केवळ संरक्षण सहकार्य मजबूत करण्याची गरज नाही तर त्याचबरोबर आर्थिक संबंध आणि व्यापारातील सहकार्य देखील वाढवण्याची गरज आहे.
भविष्यातील तंत्रज्ञानात भारतासोबत सहकार्याची गरजही अमेरिकन खासदाराने व्यक्त केली. भविष्यातील तंत्रज्ञानाच्या अटी व शर्ती ठरवण्यासाठी दोन्ही देशांनी एकत्रित काम केले पाहिजे, असे ते म्हणाले. आता जगभरातील लोकशाही कृत्रिम बुद्धिमत्ता, क्वांटम कॉम्प्युटिंग, अक्षय ऊर्जा, आधुनिक सेमीकंडक्टर उत्पादन इत्यादी क्षेत्रात चीनशी स्पर्धा करत आहेत. भारत-अमेरिकेसह जगातील सर्व लोकशाही देशांनी या तंत्रज्ञानाला निरंकुश राजवटीचे हत्यार न बनवता समृद्धीचे वाहक बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असेही ते म्हणाले. चीन आपल्या लोकांची हेरगिरी करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करत आहे, असे अमेरिकेच्या खासदाराने म्हटले आहे. भारताचे कौतुक करताना शूमर म्हणाले की, भारत अतुलनीय आहे आणि त्यांनी अमेरिकेत राहणार्या भारतीय वंशाच्या लोकांचेही कौतुक केले.