किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलदत्तात्रेय होसबळे यांचे प्रतिपादन,
कोल्हापूर, (२६ फेब्रुवारी ) – आपले जीवन भोगवादी बनले आहे. उपभोगासाठी आपण सृष्टीचा संहार करीत आहोत. आपण ‘कमोडिटी कल्चर’ मध्ये जगत आहोत. आपली जीवनशैली बदलली तरच पर्यावरण संवर्धन होऊ शकेल, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी केले. सिद्धगिरी मठामध्ये आयोजित सुमंगल लोकोत्सवाच्या सांगता समारंभात ते बोलत होते.
यावेळी अध्यक्षीय भाषणात होसबळे म्हणाले, मोक्ष मिळावा म्हणून काहीजण धार्मिक कार्यात सहभागी होतात. मात्र विश्वाच्या कल्याणाची इच्छा बाळगून सर्वस्वाचा त्याग करून जगणारे साधुसंत आपल्या देशात आहेत. त्यांनी जगाला मार्गदर्शन करावे हीच हिंदू धर्माची त्यांच्याकडून अपेक्षा आहे. याच दृष्टिकोनातून काडसिद्धेश्वर स्वामी यांनी पंचमहाभूत सुमंगल लोकोत्सवाची संकल्पना मांडली.
आपले शरीर पंचतत्त्वांपासून बनले आहे. माणसाने तपश्चर्या करून स्वत:च्या अस्तित्वाचा शोध लावला. त्यावेळी या पंचमहाभूतांच्या अस्तित्वाची जाणीव झाली. पृथ्वी, वायू, जल, अग्नी व आकाश ही पाच तत्त्वे असून, त्यापासूनच सृष्टीची निर्मिती झाली आहे. मानवाच्या उपभोग्य जीवनशैलीमुळे या पंचतत्त्वांचा संहार सुरू आहे. पश्चिमात्य जगात पर्यावरणाचा र्हास गतीने सुरू आहे. तरी ते आपल्याला प्रदूषण नियंत्रण संदर्भात सूचना करतात. त्यांच्या कमोडिटी कल्चरमुळेच पर्यावरण धोक्यात आले आहे. आपणही त्याच वाटेने चाललो आहोत. भारतीय संस्कृतीमध्ये सृष्टीतील सूक्ष्म घटकाचा देखील विचार केला आहे. हा विचार आत्मसात करून आपण आपली जीवनशैली बदलली तरच पर्यावरणाचे संवर्धन होऊ शकेल. याच दृष्टिकोनातून सुमंगल लोकोत्सवाची मांडणी केली आहे. यातील प्रत्येक प्रयोगाचा विचार करून आपापल्या ठिकाणी अंमलबजावणी केल्यास आपण पर्यावरण विषयक निश्चित काही मोठे काम करू शकतो, योगदान देऊ शकतो, असेही सरकार्यवाह म्हणाले.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ‘काडसिद्धेश्वर स्वामी नेहमीच माणसाच्या मूलभूत गोष्टींवरती काम करतात. गाय, शेती, आरोग्य यामध्ये त्यांनी मोठे कार्य केले आहे. सुमंगल लोकोत्सवातील विचार घरोघरी नेण्यासाठी केंद्र व राज्य सरकार कटिबद्ध आहे,’ असे विचार व्यक्त केले.
याप्रसंगी काडसिद्धेश्वर स्वामी यांनी मार्गदर्शन केले. जमीन, जंगल आणि जल यांच्या संवर्धनासाठी आपल्याला भारतीय संस्कृतीचा स्वीकार करावा लागेल. पूर्वी आपले जीवन निसर्गावर अवलंबून होते. मात्र, आपण निसर्गावर मात करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळेच त्सुनामी, महापूर, भूस्खलन यासारख्या समस्यांनी आपण ग‘स्त झालो आहोत. पंचतत्त्वांच्या संवर्धनासाठी घरातून प्रयत्न झाले पाहिजे. प्लॅस्टिकचा वापर बंद करावा. प्रत्येक व्यक्तीने वृक्षारोपण केले पाहिजे. पाण्याचा मर्यादित वापर करावा. असे केले तरच या महोत्सवाचे यश अधोरेखित होईल, असे मत व्यक्त केले.