किमान तापमान : 23.32° से.
कमाल तापमान : 23.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 46 %
वायू वेग : 4.32 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.99° से.
22.49°से. - 25.53°से.
रविवार, 12 जानेवारी साफ आकाश23.62°से. - 27.14°से.
सोमवार, 13 जानेवारी कुछ बादल24.17°से. - 25.97°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश24.12°से. - 25.55°से.
बुधवार, 15 जानेवारी छितरे हुए बादल23.64°से. - 26°से.
गुरुवार, 16 जानेवारी छितरे हुए बादल24.67°से. - 27.56°से.
शुक्रवार, 17 जानेवारी टूटे हुए बादल– सरकारने पाठवली नोटीस,
नवी दिल्ली, (१३ जानेवारी) – यूट्यूबच्या भारतातील सार्वजनिक धोरण आणि सरकारी व्यवहार प्रमुख, मीरा चॅट यांना १५ जानेवारी रोजी नोटीस मिळाली. ही नोटीस नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राइट्सने दिली आहे. बाल लैंगिक शोषण सामग्री रोखण्यात ती अयशस्वी ठरल्याचे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. याशिवाय मुलांशी संबंधित इतर मजकुरावर बंदी न घातल्याचा ठपकाही त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
एनसीपीसीआरचे प्रमुख प्रियांक कानूनगो यांनी १० जानेवारी रोजी मीराला कार्यालयात हजर राहण्यास सांगितले होते. ती हजर न झाल्यास यूट्यूबवर कायदेशीर कारवाईही होऊ शकते. त्यामुळे मीराला हजेरी लावावी लागणार आहे.
मुलांच्या हक्कांसाठी काम करणार्या संस्थेने मीरा चॅटला अशा चॅनेलची यादी सादर करण्यास सांगितले आहे जे मुलांविरोधात आक्षेपार्ह मजकूर सादर करत आहेत. अशा परिस्थितीत वाहिन्यांवर सातत्याने कारवाई केली जात आहे. मात्र यादी समोर आल्यानंतर यूट्यूबला त्यांच्यावर कडक कारवाई करण्यास सांगितले जाऊ शकते.
दरम्यान, महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर सेलने यूट्यूब इंडिया आणि मुलांविरुद्ध आक्षेपार्ह मजकूर सादर करणार्या काही चॅनेलच्या अधिकार्यांविरोधात एफआयआर नोंदवला आहे. एनसीपीसीआरच्या नोटीसनंतर हा एफआयआरही नोंदवण्यात आला आहे. अशा परिस्थितीत यूट्यूबला कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागू शकते. मात्र, अद्यापपर्यंत यूट्यूब इंडियाकडून या मेलला कोणताही प्रतिसाद देण्यात आलेला नाही.
या विषयावर बोलताना तज्ज्ञांनी सांगितले की, मुलांबाबत आक्षेपार्ह मजकुरावर बंदी आहे. आयटी नियम ३(१)(ल) अंतर्गत अशा प्रकारची सामग्री सादर करण्यावर कारवाई केली जाऊ शकते. अशा परिस्थितीत यूट्यूबने अशा प्रकारचा मजकूर रोखण्यासाठी तातडीने कारवाई करावी.