किमान तापमान : 26.49° से.
कमाल तापमान : 26.99° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 36 %
वायू वेग : 3.32 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.99° से.
24.27°से. - 28.14°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर घनघोर बादल24.05°से. - 28.38°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर छितरे हुए बादल24.28°से. - 28.24°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.41°से. - 27.68°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर छितरे हुए बादल23.18°से. - 27.95°से.
रविवार, 01 डिसेंबर कुछ बादल23.02°से. - 26.24°से.
सोमवार, 02 डिसेंबर टूटे हुए बादलनवी दिल्ली, (९ मार्च) – भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत आणि त्यांच्या कुटुंबीयांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्यामुळे खळबळ उडाली आहे. पोलिसात तक्रार दिल्यानंतर पोलिस याप्रकरणी तपास करत आहे. भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष नरेश टिकैत यांचा मुलगा गौरव टिकैत यांच्या मोबाईलवर धमकीचे हे फोन आले. सुरुवातीला कोणाचा तरी खोडसाळपणा असेल असे समजून मी त्याकडे दुर्लक्ष केले, पण धमकी देणार्या फोनची संख्या वाढल्यामुळे मी पोलिसात तक्रार दाखल केली, असे गौरव टिकैत यांनी सांगितले. ८ मार्चला म्हणजे धुळवडीच्या दिवशी रात्री ९.१५ ते १० वाजेदरम्यान धमकीचे हे फोन मला आले, फोन करणारा संपूर्ण टिकैत कुटुंबाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देत होता, असे गौरव टिकैत यांनी सांगितले.
नरेश टिकैत आणि राकेश टिकैत यांनी भारतीय किसान युनियनशी असलेले आपले संबंध तोडावे, अशी धमकी या फोनद्वारे देण्यात आली. भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र पाठवत या धमकीबाबतची माहिती दिली. दिल्लीत शेतकर्यांचे आंदोलन करून आपण ठिक नाही केले, तुम्ही शेतकर्यांशी बोलणे थांबवा, भाकियुपासून दूर जा, तुम्ही या आंदोलनापासून दूर झाले नाही तर तुमच्या पूर्ण कुटुंबाला बॉम्बने उडवून देऊ, अशी धमकी आम्हाला देण्यात आल्याचे टिकैत यांनी या पत्रात म्हटले आहे. आम्ही शेतकर्यांची लढाई लढत असतो, हे सामाजिक काम आहे, यासाठी आम्हाला देशभर प्रवासही करावा लागतो, त्यामुळे बाहेर राज्यात प्रवासावर असताना आमच्यासाठी सुरक्षा व्यवस्था केली पाहिजे, त्याचप्रमाणे गृहमंत्रालयाने या धमकीची गंभीरपणे दखल घेत आम्हाला सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी या पत्रातून करण्यात आली.