किमान तापमान : 25.41° से.
कमाल तापमान : 26.46° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 8.35 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.46° से.
23.58°से. - 26.99°से.
शुक्रवार, 24 जानेवारी टूटे हुए बादल23.33°से. - 27.04°से.
शनिवार, 25 जानेवारी टूटे हुए बादल25.05°से. - 27.61°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.42°से. - 28.19°से.
सोमवार, 27 जानेवारी साफ आकाश25.65°से. - 27.75°से.
मंगळवार, 28 जानेवारी कुछ बादल25.13°से. - 26.87°से.
बुधवार, 29 जानेवारी घनघोर बादलनवी दिल्ली, (१५ फेब्रुवारी ) – एलोन मस्क यांनी ट्विटर खरेदी केल्यानंतर त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे ट्विटर आणि एलोन मस्क चर्चेत आहेत. मस्क यांनी नवीन ट्विटर सीईओच्या शोधात असल्याचे म्हटले होते. आता त्यांनी ट्विटरच्या नव्या सीईओची घोषणा केली आहे. याबाबत त्यांनी ट्विट करून माहिती दिली आहे.मस्कने ट्विटरवर ४४ अब्ज डॉलरची डील पूर्ण केल्यानंतर पराग अग्रवालला कंपनीने बाहेरचा रस्ता दाखवला होता. केवळ ट्विटरचे माजी सीईओच नाही तर ट्विटरच्या कायदेशीर प्रमुख विजया गड्डे आणि सीएफओ नेल सेगल यांनाही कंपनीने बाहेरचा रस्ता दाखवला.
ट्विटरचा नवा सीईओ हा माणूस नसून कुत्रा आहे. हा मस्कचा पाळीव कुत्रा फ्लोकी (शिबा इनू) आहे. मस्कने त्याच्या शिबा इनू कुत्र्याचे काही फोटोही पोस्ट केले आहेत. फोटोमध्ये त्यांचा कुत्रा सीईओच्या खुर्चीवर बसलेला दिसत आहे. काळ्या रंगाचा स्वेटर परिधान केला आहे. त्यावर सीईओ लिहिलेले असून ट्विटरच्या सीईओबाबतची कागदपत्रेही समोरच्या टेबलावर दिसत आहेत. त्यात पंजाचे ठसेही दिसतात.
त्याच्या टेबलावर एक छोटा लॅपटॉपही आहे, ज्यावर ट्विटरचा लोगो बनवला आहे. एलोन मस्कने फ्लोकीचा आणखी एक फोटोही शेअर केला आहे. दुसर्या फोटोत त्याने टायही घातला असून त्याच्या टेबलावर अनेक कागदपत्रे पडलेली आहेत. दुसरा फोटो काढत मस्कने लिहिले आहे की तो नंबरसह खूप चांगला आहे. तर तिसर्या फोटोमध्ये मस्कने त्याच्या कुत्र्याचा स्टाईल केलेला फोटो टाकून त्याचे कौतुक केले आहे. हे ट्विट लिहेपर्यंत सुमारे १ लाख लाईक्स मिळाले आहेत. यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रियाही देत आहेत. या ट्विटला विनोद म्हणून पाहिले जात आहे.