किमान तापमान : 23.99° से.
कमाल तापमान : 24.96° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 60 %
वायू वेग : 3.61 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.99° से.
23.99°से. - 28.17°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.25°से. - 28.57°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.42°से. - 28.53°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.23°से. - 28.31°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर घनघोर बादल23.73°से. - 28.08°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर घनघोर बादल23.39°से. - 28.07°से.
रविवार, 01 डिसेंबर छितरे हुए बादलनवी दिल्ली, (३० मार्च) – पृथ्वीवर राहणारे व्यक्ती अमरत्व मिळवू शकते का? हा प्रश्न शतकानुशतके जुना आहे. मात्र या प्रश्नाचे उत्तर आजतागायत कोणालाही सापडलेले नाही. पृथ्वीवर जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीचा मृत्यू होतोच. पण मानव लवकरच अमर होऊ शकतो, असा दावा एका शास्त्रज्ञाने करून सर्वांनाच हैराण केले आहे. २०३१ पर्यंत मानवाला अमरत्व प्राप्त होईल, असा दावा या शास्त्रज्ञाने केला आहे. म्हणजेच ही मोठी क्रांती अवघ्या आठ वर्षांनी जगात येऊ शकते. शास्त्रज्ञ म्हणतात की आपण अशा कालखंडातून जात आहोत जिथे तांत्रिक बदल मोठ्या प्रमाणावर होत आहेत. ज्याचा आपल्या जीवनावर मोठा प्रभाव पडतो. येत्या काळात हे तांत्रिक बदल आपले जीवन बदलतील अशी शक्यता आहे.
त्याच्या दाव्याला धक्का देत, हा शास्त्रज्ञ म्हणतो की, आजकाल मानव अमरत्वाचे रहस्य डीकोड करण्याच्या जवळ आहेत आणि दहा वर्षांत हा चमत्कार घडण्याची शक्यता आहे. दावेदार हे दुसरे कोणी नसून रे कुर्झवील आहेत, जे एक भविष्यवादी आणि संगणक शास्त्रज्ञ म्हणून जगात प्रसिद्ध आहेत. त्यांचे अनेक भाकीत खरे ठरल्याचे बोलले जात आहे. त्यांचा असा विश्वास आहे की मानव कृत्रिम बुद्धिमत्ता (अख) मध्ये प्रभुत्व मिळवण्याच्या मार्गावर आहेत आणि जेव्हा हे पूर्णपणे साध्य होईल, तेव्हा लोकांना यापुढे त्यांच्या भौतिक शरीरात राहण्याची गरज भासणार नाही. २०३० पर्यंत हा पराक्रम शक्य होईल, असा दावा कुर्झवील यांनी केला आहे. रे कुर्झविल यांचा दावा गांभीर्याने घेतला जात आहे कारण त्यांनी यापूर्वी केलेले सर्व अंदाज खरे ठरले आहेत. १९९० मध्ये, त्यांनी भाकीत केले होते की नवीन सहस्राब्दीमध्ये जग संगणकाचे गुलाम होईल, जे खरे ठरले. आता त्याने म्हटले आहे की, पुढच्या काही वर्षांत संगणकाची ताकद इतकी होईल की अमरत्व आपल्या आवाक्यात येईल. २०२९ पर्यंत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून माणूस जगात चमत्कार घडवणार आहे, असा दावा त्यांनी केला आहे.