किमान तापमान : 24.05° से.
कमाल तापमान : 24.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 57 %
वायू वेग : 6.18 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.99° से.
23.71°से. - 24.99°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.37°से. - 25.6°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.45°से. - 26.84°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश23.9°से. - 25.67°से.
बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश23.94°से. - 25.02°से.
गुरुवार, 16 जानेवारी घनघोर बादल23.69°से. - 26.74°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादल– तिसऱ्या ग्लोबल मेरीटाईम इंडिया समिटचे उद्घाटन,
मुंबई, (१७ ऑक्टोबर) – जगातील तिसर्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेकडे भारताची वाटचाल सुरू आहे. सागरी व्यापाराचा यात मोठा वाटा असणार आहे. बंदरे, जहाजबांधणी क्षेत्रातील जागतिक गुंतवणूकदारांसाठी भारतात गुंतवणूक करण्याची मोठी संधी आहे. येत्या काळात सागरी व्यापार क्षेत्रातही आघाडीचा देश म्हणून भारताचा उदय झालेला असेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे तिसर्या ग्लोबल मेरीटाईम इंडिया समिटचे उद्घाटन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. मुंबईतील एमएमआरडीए मैदानावर आजपासून सुरू झालेली ही परिषद १९ ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. यावेळी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय बंदर व जलवाहतूक मंत्री सर्वानंद सोनोवाल, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत तसेच विविध देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
२३ हजार कोटींपेक्षा जास्तीचे प्रकल्प
या कार्यक्रमात मोदी यांच्या हस्ते भारतीय सागरी नील अर्थव्यवस्थेच्या दीर्घकालीन ब्लू प्रिंटचे अर्थात् ‘अमृतकाल व्हिजन २०४७’ चे अनावरण करण्यात आले. या ब्लू प्रिंटमध्ये बंदरांमधील सेवासुविधा वाढविण्यासह शाश्वत पद्धतींना चालना आणि आंतरराष्ट्रीय सहयोग वृद्धी याविषयी अनेक धोरणात्मक उपाययोजनांचा समावेश आहे. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते २३ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या प्रकल्पांची मुहूर्तमेढ करण्यात आली. यावेळी सागरी क्षेत्रात जागतिक आणि राष्ट्रीय भागीदारीसंदर्भात झालेले ७ लाख कोटींचे ३०० हून अधिक सामंजस्य करार करण्यात आले. पंतप्रधान मोदी म्हणाले की, कोरोना महामारीनंतर जग बदलले. भारताकडे जग वेगळ्या अपेक्षेने बघत आहे. लवकरच भारत जगातील पहिल्या तीन अर्थव्यवस्थांपैकी एक असेल. सागरी व्यापाराचा मोठा वाटा अर्थव्यवस्थेत आहे. ही परिषद त्या अनुषंगाने महत्त्वाची आहे.
मेक इन इंडियावर भर
गेल्या ९ वर्षांत लॉजिस्टिक्स परफॉर्मन्स इंडेक्स खूप सुधारला आहे. आयएनएस विक्रांत देशाच्या सामर्थ्याचे प्रतीक आहे. लवकरच जहाज बांधणीत आपण देशाला आघाडीवर नेऊ यात शंका नाही. आपण मेक इन इंडियावर भर दिला आहे. भारताकडे विशाल सागरी किनारा, मजबूत इको सिस्टीम, सांस्कृतिक वारसा आहे. जगातली सर्वांत मोठी रिव्हर क्रूझ सर्व्हिस आपण सुरू केली आहे, असे मोदी यांनी सांगितले.