किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलनागपूर, (२० जुलै) – आज सकाळी अचानक देशभरात अनेक मोबाईल वापरकर्त्यांना भारत सरकारच्या दूरसंचार विभागाच्यावतीने अलर्ट आला. यामुळे अनेकांची तारांबळ उडाली होती. या अलर्टमध्ये नागरिकांच्या फोनवर अचानक एक अलार्म वाजण्यास सुरुवात झाली असल्याने अनेकांचे धाबे दणाणले होते. मात्र भारत सरकारच्या दूरसंचार विभागाकडून आपतकालीन अलर्ट सेवेचे चाचणी घेण्यासाठी मोबाईलवर हा संदेश आणि अलार्म वाजल्याचे पुढे स्पष्ट करण्यात आले आहे.
महत्त्वाचे म्हणजे हा अलर्ट आला त्याबाबत काहीही पूर्वकल्पना देण्यात आलेली नव्हती. तसेच या अलर्टबाबत आता केंद्र सरकारच्या माहिती प्रसारण मंत्रालय किंवा पीआयबीच्या ट्विटर हँडलवर माहिती देण्यात आली नाही. माहितीनुसार आज सकाळी जवळपास दहा ते साडेदहाच्या सुमारास अनेक मोबाइलधारकांचे मोबाईल वाजायला लागले आणि मोबाईलच्या स्क्रिनवर एक संदेश झळकू लागला. यामध्ये हा संदेश भारत सरकारच्या दूरसंचार विभागाच्या आपतकालीन संदेश सेवेचा भाग असल्याचे लिहण्यात आले होते. काही सेकंद मोठ्या आवाजात अलार्म वाजल्यानंतर तोच मेसेज व्हॉईस मेल स्वरुपात ऐकू आला आणि तुम्हाला असे आपतकालीन अलर्ट हवे असल्यास आपतकालीन संदेशातील ओके बटनावर क्लिक करा असे सांगण्यात आले. तसेच यामध्ये हो आणि नाही असे पर्याय देण्यात आले होते. तसेच हा अलर्ट इंग्रजीत आला आणि त्यानंतर मराठीत आला.