किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलकारवाईत एक जवानही शहीद,
जम्मू, (२८ फेब्रुवारी ) – जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत जवानांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. या दोन्ही दहशतवाद्यांचा यापूर्वी काश्मिरी पंडित संजय शर्मा यांच्या हत्येत हात असल्याचे मानले जात आहे. त्याचबरोबर या चकमकीत लष्कराचा एक जवानही शहीद झाला आहे. या भागातील एका मशिदीत दहशतवादी लपून बसले होते. त्यामुळे सुरक्षा दलांनी संयम बाळगला आणि अत्यंत सावधगिरीने कारवाई केली. सुरक्षा दलांना सशस्त्र दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर सुरक्षा दलांनी पदगमपूर परिसराची नाकाबंदी सुरू केली. वेढा घातल्यानंतर सैनिकांनी शोध सुरू केला. दरम्यान, मशिदीच्या परिसरात एका दहशतवाद्याला ठार करण्यात आले. तर दुसरा खिडकीतून उडी मारून मशिदीजवळील घरात लपला. त्यालाही सैनिकांनी ठार केले. आकिब मुश्ताक आणि एजाज भट अशी या दोन्ही दहशतवाद्यांची नावे आहेत.
लष्कराच्या संपूर्ण कारवाईत दोन्ही बाजूंनी गोळीबाराच्या अनेक फेर्या झाल्या. यादरम्यान एका जवानालाही दहशतवाद्यांनी गोळ्या घातल्या. ५५ राष्ट्रीय रायफल्सच्या एका जवानाच्या मांडीला गोळी लागली. त्यामुळे त्यांची एक मुख्य धमनी खराब झाली आणि जास्त रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान काश्मिरी पंडित संजय सिंह यांच्या हत्येत दोघांचाही सहभाग होता. बँक सुरक्षा रक्षक संजय शर्मा यांची रविवारी जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. या दोघांचाही संजय शर्मीच्या टार्गेट किलिंगमध्ये सहभाग असल्याचे सांगण्यात येत आहे. उल्लेखनीय आहे की, यापूर्वी काश्मीरचे अतिरिक्त पोलीस महासंचालक विजय शर्मा यांनीही पुलवामामध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्याची ओळख आकिब मुश्ताक भट असे ट्विट केले होते. एडीजीपी काश्मीरच्या म्हणण्यानुसार, आकिब मुस्ताक भट याने यापूर्वी हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेसाठी काम केले होते, सध्या तो टीआरएफ या दहशतवादी संघटनेसाठी काम करत होता.