किमान तापमान : 24.59° से.
कमाल तापमान : 25.79° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 50 %
वायू वेग : 5.84 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.59° से.
23.83°से. - 25.97°से.
शुक्रवार, 24 जानेवारी छितरे हुए बादल23.33°से. - 26.99°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.01°से. - 27.57°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.47°से. - 27.72°से.
सोमवार, 27 जानेवारी टूटे हुए बादल25.66°से. - 27.64°से.
मंगळवार, 28 जानेवारी साफ आकाश25.05°से. - 27.04°से.
बुधवार, 29 जानेवारी टूटे हुए बादलनवी दिल्ली, १० नोव्हेंबर – दत्तोपंत ठेंगडी यांच्या विचारांमध्ये सुस्पष्टता होती. ते देवतुल्य, ऋषितुल्य व्यक्ती होते. त्यांचे विचार आणि तत्त्वज्ञान कार्यकर्त्यांसाठी नेहमीच प्रेरणादायी राहील, असे गौरवोद्गार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह सुरेश (भय्याजी) जोशी यांनी काढले.
भारतीय मजदूर संघाचे संस्थापक दत्तोपंत ठेंगडी यांच्या १०१ व्या जयंतीच्या अनुषंगाने त्यांच्या स्मरणार्थ केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते टपाल तिकिटाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून भय्याजी जोशी बोलत होते. ते म्हणाले की, दत्तोपंतांच्या विचारांमध्ये स्पष्टता होती. त्यांचे मत होते की, संघटना कामगारांच्या हितासाठी कार्य करेल आणि कामगार हा देशहितासाठी काम करेल. बंद, संप, हरताळ यांचे ते फारसे समर्थन करत नव्हते. कितीही अगतिकता असली तरी आपल्या मागण्यांसाठी अडून बसण्यापेक्षा राष्ट्रहितासाठी काम केले पाहिजे, असे ते संघटनेतील कामगारांना सांगत असत.
भारतीय मजदूर संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष हिरण्मय जे. पंड्या आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, दत्तोपंतांचे लेख, भाषण आणि त्यांचे साहित्य हे त्यांच्या विचारांच्या रूपात पुढील पिढ्यांसाठी कायम मार्गदर्शक म्हणून राहतील.
राजधानीतील विज्ञान भवन येथे आयोजित या समारंभाला भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय राज्यमंत्री मीनाक्षी लेखी, दिल्ली प्रदेश भामसंचे अनीश मिश्रा यांच्यासह भारतीय मजदूर संघाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.