किमान तापमान : 27.51° से.
कमाल तापमान : 27.99° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 51 %
वायू वेग : 3.91 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.99° से.
27.6°से. - 31.02°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर घनघोर बादल27.01°से. - 30.73°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.06°से. - 30.41°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.16°से. - 31.05°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.39°से. - 30.44°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.66°से. - 30.5°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश– उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे प्रतिपादन,
नवी दिल्ली, (२१ नोव्हेंबर) – आपल्या देशाचे सांस्कृतिक आचार विचार प्रतिबिंबित करणारी मानसिकता जोपासण्यावर उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी भर दिला आहे. ते आज नवी दिल्ली येथील संथीगिरी आश्रमाच्या रौप्यमहोत्सवी समारंभाला संबोधित करताना बोलत होते. आपली संस्कृती हा आपला कणा असून, भारताचे प्राचीन ज्ञान आणि यश याचा सर्वांनी अभिमान बाळगायला हवा, असे त्यांनी यावेळी सांगितले. ‘गुरु-शिष्य’ परंपरेचे पुनरुज्जीवन व्हायला हवे, असे उपराष्ट्रपती म्हणाले.
आश्रमाने महिला सक्षमीकरणावर भर दिल्याबद्दल उपराष्ट्रपती धनखड यांनी प्रशंसा केली आणि ते म्हणाले, मानवतेच्या विकासाकरता महिलांचे सक्षमीकरण महत्त्वाचे आहे. हा एक पर्याय नसून, हाच एकमेव मार्ग आहे! या अनुषंगाने त्यांनी संसदेत नुकत्याच मंजूर झालेल्या महिला आरक्षण विधेयकाचे महत्वही अधोरेखित केले. आरोग्य व्यवस्थापन क्षेत्रात भारताकडे असलेल्या संचिताचा आपल्याला विसर पडला होता. त्याला आज जागतिक स्तरावर मोठी मान्यता मिळत आहे, ही गोष्ट आनंददायी आहे, त्यांनी नमूद केले.
नैसर्गिक साधनसंपत्तीचा बेसुमार वापर टाळून त्याचा जबाबदारीने वापर करण्याच्या गरजेवर भर देत उपराष्ट्रपती म्हणाले, पृथ्वी हा ग्रह केवळ मानवासाठी नसून, संपूर्ण जीव सृष्टीसाठी आहे, याची आपल्याला जाणीव व्हायला हवी.
आपल्या संसदेत वादविवाद आणि चर्चे ऐवजी होत असलेला व्यत्यय आणि गदारोळ, याबद्दल व्यथित होत , राजकीय नेत्यांनी देशहिताला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे आवाहन उपराष्ट्रपती धनखड यांनी केले.