किमान तापमान : 23.81° से.
कमाल तापमान : 23.93° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 57 %
वायू वेग : 4.88 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.93° से.
23.71°से. - 24.88°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.37°से. - 25.6°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.45°से. - 26.84°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश23.9°से. - 25.67°से.
बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश23.94°से. - 25.02°से.
गुरुवार, 16 जानेवारी घनघोर बादल23.69°से. - 26.74°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादल– आमदार अपात्रता प्रकरण,
मुंबई, (३० सप्टेंबर) – आमदार अपात्रता प्रकरणी ठाकरे गटाने विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात शपथपत्र सादर केले. अध्यक्षांनी जाहीर केलेल्या वेळापत्रकावर ठाकरे गटाने आक्षेप घेतला आहे. अपात्रतेचा मुद्दा सोडून इतर विषयांत अध्यक्ष वेळ घालवत असल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे. विधासभा अध्यक्षांनी जाहीर केलेले वेळापत्रक आणि होणारा विलंब पाहता ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात पोहोचला. याप्रकरणी ६ ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे.
आम्ही लवकरच नार्वेकरांविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे ठाकरे गटाचे नेते अनिल परब म्हणाले होते. राहुल नार्वेकर यांनी २५ सप्टेंबरला आमदार अपात्रतेप्रकरणी सुनावणी घेतली. ही सुनावणी विधानभवनातील मध्यवर्ती सभागृहात पार पडली होती. सर्व ३४ याचिका एकत्रित करून सुनावणी करा, अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली. मात्र, सर्व याचिकांच्या एकत्रित सुनावणीला शिवसेनेच्या वकिलांनी विरोध केला आणि स्वतंत्र सुनावणी घेण्याची मागणी केली. या प्रकरणी पुढील सुनावणी १३ ऑक्टोबर रोजी होणार आहे.