किमान तापमान : 27.51° से.
कमाल तापमान : 27.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 51 %
वायू वेग : 3.91 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.99° से.
27.6°से. - 31.02°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.01°से. - 30.73°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.06°से. - 30.41°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.16°से. - 31.05°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.39°से. - 30.44°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.66°से. - 30.5°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश-केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांची राहुल गांधींवर उपरोधिक टीका,
नवी दिल्ली, (०२ जानेवारी) – न्याय यात्रा काढायची की ज्ञान यात्रा, हे अगोदर निश्चित करावे आणि मग त्यावर अंमलबजावणी करावी, अशी उपरोधिक टीका केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी काँग्रेस नेता राहुल गांधी यांच्यावर केली. सध्या आपण २१ व्या शतकातील भारताचा अनुभव घेत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात जगभरात भारत सनातन धर्माचे वैभव आणि विकासाचा महारथ पुढे नेत आहे. पंतप्रधान मोदी अबुधाबीमध्ये एका सनातन मंदिराची स्थापना करीत आहे. ते सध्या स्वामी विवेकानंद यांच्या पदचिन्हांवर मार्गक्रमणाचा प्रयत्न करीत आहे.
अशातच राहुल गांधी यांनी १४ जानेवारीपासून न्याय यात्रा काढायची की ज्ञान यात्रेला प्राधान्य द्यायचे, याबाबत त्यांना निर्णय घ्यायचा आहे, असे गिरीराज सिंह यांनी म्हटले आहे. दुसरीकडे, भाजपाने काँग्रेसच्या पदयात्रेला ढोंग संबोधले आहे. जे लोक अन्याय करण्यासाठी ओळखले जातात, तेच आता न्यायाचे ढोंग करीत आहेत, अशी टीका भाजपा नेत्या स्मृती इराणी यांनी केली. दरम्यान, केंद्रात पुन्हा एकदा सत्ताप्राप्तीसाठी राहुल गांधी आणखी एका पदयात्रा सुरू करणार आहे. भारत न्याय यात्रेचा शुभारंभ १४ जानेवारी पासून होणार असून, पूर्व ते पश्चिम भागात सुमारे ६ हजार २०० किलोमीटर अंतर ६७ दिवसांत १४ राज्यांतील ८५ जिल्ह्यांतून पार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते.