किमान तापमान : 29.2° से.
कमाल तापमान : 29.63° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 2.05 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
29.2° से.
27.37°से. - 29.77°से.
रविवार, 17 नोव्हेंबर हल्की वर्षा27.47°से. - 31.24°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.29°से. - 31.41°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.45°से. - 30.88°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.91°से. - 30.52°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश25.48°से. - 30.03°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर साफ आकाश-ऑनलाईन नोंदणी पोर्टलवर सुरू,
नवी दिल्ली, (०४ सप्टेंबर) – आगामी १७ सप्टेंबर अर्थात् पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनी राष्ट्रीय स्तरावर विश्वकर्मा योजनेचा शुभारंभ करण्यात येणार आहे. या अंतर्गत पारंपरिक शिल्पकार, कारागिरांच्या व्यवसाय-रोजगारांसह कौशल्याला प्रोत्साहन देण्यात येणार असून, या संदर्भातील ऑनलाईन नोंदणी विश्वकर्मा पोर्टलवर २५ ऑगस्टपासून सुरू झाली असल्याचे सूत्राने सांगितले.
विश्वकर्मा योजनेत १८ परंपरागत व्यवसायांचा समावेश करण्यात आला असून, शहरी आणि ग्रामीण क्षेत्रातील लोकांना त्याचा लाभ मिळणार आहे. संबंधितांची निवड मुलाखतीद्वारे होईल. निवड झालेल्या उमेदवारांना ५०० रुपये प्रतिदिन दराने मानधन मिळू शकेल. याशिवाय एक ई-व्हाऊचर सुद्धा प्राप्त होणार असून, त्याद्वारे १५ हजार रुपये किमतीची उपकरणे खरेदी करता येणार आहे. उमेदवारांना ओळखपत्र आणि पीएम विश्वकर्मा प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल. प्रशिक्षित लाभार्थ्याला बँकद्वारे ५ टक्के व्याजदराने पहिल्यांदा १ लाख रुपयांचे कर्ज (यासाठी कोणत्याही प्रकारच्या जामिनाची गरज नाही) मिळेल.
ही रक्कम दीड वर्षांत अर्थात् १८ महिन्यांत परत करावी लागेल. यानंतर व्यवसायाला वाढविण्यासाठी दोन लाख रुपयांचे कर्ज मिळेल. ही रक्कम अडीच वर्षांत अर्थात् ३० महिन्यांत परत करावी लागणार आहे. दरम्यान, वि×श्वकर्मा योजनेंतर्गत लोहार, सुतार, होडी तयार करणारे, कुलूप बनविणारे, सोनार, कुंभार, मूर्तिकार, बांधकाम करणारे अर्थात राजमिस्त्री, डलिया, चटई तयार करणारे, पारंपरिक खेळणी बनविणारे, न्हावी, धोबी, शिंपी, मासोळी जाळे तयार करणार्यांचा समावेश केला आहे.