किमान तापमान : 26.41° से.
कमाल तापमान : 30.13° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 36 %
वायू वेग : 4.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
30.13° से.
23.36°से. - 31.99°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश24.93°से. - 27.39°से.
रविवार, 26 जानेवारी छितरे हुए बादल25.34°से. - 28.48°से.
सोमवार, 27 जानेवारी साफ आकाश25.41°से. - 27.46°से.
मंगळवार, 28 जानेवारी साफ आकाश25.27°से. - 27.02°से.
बुधवार, 29 जानेवारी घनघोर बादल24.53°से. - 26.49°से.
गुरुवार, 30 जानेवारी टूटे हुए बादलबंगळुरू, (११ मार्च) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी ११८ किलोमीटर लांबीच्या नव्या बंगळुरू-म्हैसूर एक्सप्रेस-वे लोकार्पण करण्यात येणार आहे. नव्या राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामासाठी एकूण ८,४८० कोटी रुपये खर्च करण्यात आले. चार रेल्वे ओव्हरब्रीज, नऊ मोठे पुल, ४० लहान पूल, ८९ अंडरपास आणि ओव्हरपासची निर्मिती केली असून, यात राष्ट्रीय महामार्ग २७५चा एक भाग सुद्धा समाविष्ट आहे.
उल्लेखनीय असे की, हा मार्ग श्रीरंगपटना, कुर्ग, उटी आणि शेजारच्या केरळमधील रस्त्यांसोबत जोडण्यात आल्याने सर्वत्र रस्त्यांचे जाळे तयार झाले आहेत. रविवारी दुपारी १२ वाजता पंतप्रधान बंगळुरू-म्हैसूर द्रुतगती महामार्गाचे लोकार्पण करतील. बंगळुरू-म्हैसूर एक्सप्रेस-वेच्या माध्यमातून सामाजिक आणि आर्थिक विकासाला प्रोत्साहन मिळू शकेल, असा दावा करण्यात येत आहे. याशिवाय अन्य काही लहान-मोठ्या रस्त्यांवरील वाहनांची गर्दी कमी होऊन प्रदूषणातही घट होणे शक्य आहे. सद्यस्थितीत बंगळुरू-म्हैसूर या दोन्ही शहरादरम्यानच्या प्रवासाला तीन तास लागत आहेत, तो वेळ आता सव्वा तासांवर आला आहे.