Posted by वृत्तभारती
Sunday, November 29th, 2020
परराष्ट्र व्यवहार मंत्री जयशंकर, नवी दिल्ली, २९ नोव्हेंबर – भारत सरकारने कोरोना काळानंतर हिंद महासागरातील सेशेल्स देशासोबत द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्याचा संकल्प जाहीर केला आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी आपल्या सेशेल्स देशाच्या दोन दिवसांच्या दौर्यात वरिष्ठ नेत्यांशी विविध मुद्यांवर चर्चा केली असून, ही भेट अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली, असे परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने एका निवेदनात म्हटले आहे. जयशंकर यांनी सेशेल्सचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष रामकलावन यांची भेट घेत त्यांना निवडणुकीतील विजयाबद्दल...
29 Nov 2020 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Friday, November 27th, 2020
नवी दिल्ली २७ नोव्हेंबर – लडाखच्या पूर्व सीमाभागातील टेहाळणी यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी भारत सरकार पुढील महिन्यात अमेरिका आणि इस्रायलसोबत ड्रोन विमाने खरेदी करण्याबाबत करार करणार आहे. इस्रायलचे हेरॉन आणि अमेरिकेचे मिनी ड्रोन या जातीची काही विमाने या करारानंतर लवकरच भारतात दाखल होतील. हेरॉन टेहळणी ड्रोन विमान खरेदी करण्याबाबतची चर्चा शेवटच्या टप्प्यात असून, डिसेंबरमध्ये या करारावर स्वाक्षरी होऊ शकते. सध्या भारतीय लष्कराकडे असलेल्या ड्रोनपेक्षा अतिशय आधुनिक असलेली हेरॉन ड्रोन, लडाखला...
27 Nov 2020 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, November 24th, 2020
केंद्र सरकारचा आणखी एक दणका, नवी दिल्ली, २४ नोव्हेंबर – उद्दाम चीनला दणके देण्याचे सत्र सुरूच ठेवताना केंद्र सरकारने आज मंगळवारी या देशाच्या आणखी ४३ ऍप्सवर बंदी जाहीर केली आहे. हे सर्वच ऍप्स भारताचे सार्वभौमत्व, एकात्मता, सुरक्षा आणि सामाजिक व्यवस्थेसाठी धोकादायक असल्याचे सरकारने हा निर्णय घेताना स्पष्ट केले. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक आणि माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाने माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६९ ए अंतर्गत या ऍप्सवर बंदी घालणारा आदेश जारी केला. या...
24 Nov 2020 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, November 23rd, 2020
नवी दिल्ली, २३ नोव्हेंबर – भारत सरकारला ऑक्सफर्डची कोरोनाप्रतिबंधक लस बाजारपेठेपेक्षा अर्ध्या किमतीत म्हणजेच २२५ ते ३०० रुपयांना उपलब्ध होण्याची शक्यता आहे. लसीची बाजारपेठेतील किंमत ५०० ते ६०० रुपये आहे. जानेवारी महिन्याच्या अखेरपर्यंत देशात ऑक्सफर्डची लस उपलब्ध होण्याची शक्यता आहे. भारताची प्रचंड लोकसंख्या लक्षात घेता केंद्र सरकार या लसीची खरेदी मोठ्या प्रमाणात करणार असल्याने सरकारला ही लस अर्ध्या किमतीत मिळण्याची शक्यता आहे. ही लस सर्वप्रथम ‘कोरोना योद्धे’ म्हणजेच डॉक्टर्स, परिचारिका,...
23 Nov 2020 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, November 23rd, 2020
लडाख, २२ नोव्हेंबर – लढाऊ विमाने आणि क्षेपणास्त्रांचे तसेच आपल्या सैनिकांचे रक्षण करण्यासाठी चीनने १९६० च्या दशकात ज्या बोगदा सुरक्षा प्रणालीचा वापर करून जपान, अमेरिका आणि उत्तर कोरियाविरोधात गनिमी युद्धकौशल्य दाखविले होते, त्याच बोगदा सुरक्षा प्रणालीचा वापर आता भारताने लडाख सीमेवर केला आहे. एकूणच भारताने चीनचेच तंत्रज्ञान या देशावर उलटवले आहे. भारतीय जवानांनी २९ व ३० ऑगस्टच्या मध्यरात्री प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील पेंगॉंग त्सो परिसरातील उंच पर्वतीय भागांवर ताबा मिळविला होता....
23 Nov 2020 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Friday, November 13th, 2020
नवी दिल्ली, १३ नोव्हेंबर – पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘आत्मनिर्भर भारत’ घोषणेमुळे अनेक चिनी कंपन्यांना फटका बसला. त्यामुळे चवताळलेल्या चीनने भारतीयांची दिवाळी अंधारात जाईल, अशी दर्पोक्ती केली आहे. लडाखमधील रक्तरंजित संघर्षानंतर तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या ‘व्होकल फॉर लोकल’ अर्थात् ‘आत्मनिर्भर भारत’ या घोषणेमुळे कोट्यवधी भारतीयांनी स्थानिक स्वदेशी वस्तूंच्या खरेदीला प्राधान्य दिले आहे. यंदा तर प्रचंड संख्येने भारतीय ग्राहकांनी दिवाळीशी संबंधित चिनी वस्तूंना टाळून स्वदेशी वस्तूंनाच प्राधान्य दिले आहे. त्यामुळे...
13 Nov 2020 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Friday, November 13th, 2020
नवी दिल्ली, १३ नोव्हेंबर – मुंबईवरील २६/११ च्या हल्ल्यात आमचेच अतिरेकी सामील होते, अशी कबुली देत, या अतिरेक्यांची नावेही पाकिस्ताननेने जाहीर केली होती. मात्र, यात मुंबई हल्ल्याच्या सूत्रधारांची नावे नसल्याने, भारताने पकिस्तानवर जोरदार हल्ला चढविला. पाकिस्तान मुंबई हल्ल्याबाबत आंतरराष्ट्रीय वचनबद्धतेपासून दूर पळण्यासाठी खोट्या गोष्टी सांगत असल्याचा आरोपही भारताने केला आहे. मुंबई हल्ल्यामागे पाकिस्तानचाच हात आहे आणि या हल्ल्याचा कटही याच देशात तयार झाला होता, हा दावा भारताने फार आधीपासूनच केला...
13 Nov 2020 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Thursday, November 12th, 2020
नवी दिल्ली, १२ नोव्हेंबर – एस-४०० क्षेपणास्त्र यंत्रणा भारताला लवकर मिळावी, हे सुनिश्चित करण्यासाठी वेगाने काम केले जात आहे, असे रशियाने आज गुरुवारी सांगितले. या क्षेपणास्त्र यंत्रणेची पहिली खेप पुढील वर्षी देशात दाखल होण्याची अपेक्षा आहे. भारतीय लष्करासाठी २०० कामोव्ह केए-२२६टी हेलिकॉप्टर्सच्या उत्पादनासाठी भारत आणि रशिया संयुक्त उपक्रम स्थापन करणार असून, या अब्जावधी डॉलर्सच्या एका करारावर सध्या काम केले जात आहे तसेच दोन्ही लष्करी वाहतूक सहकार्य करारावरही काम करीत आहेत,...
12 Nov 2020 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Thursday, November 12th, 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन, नवी दिल्ली, १२ नोव्हेंबर – आसियान देशांत सामाजिक, डिजिटल आणि आर्थिक क्षेत्राचा समावेश असलेली जोडणी वाढवण्यास भारताचे सर्वाधिक प्राधान्य आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुरुवारी भारत आणि आसियान देशांच्या परिषदेत सांगितले. प्रदेशातील सर्वांसाठी सुरक्षा आणि वृद्धीसाठी एक सुसंगत प्रतिसाद देण्यासाठी आसियान आवश्यक असल्याचा आम्हाला विश्वास आहे. भारताच्या भारत-प्रशांत पुढाकार आणि आसियानचा भारत-प्रशांतकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात कितीतरी साम्य आहे. भौतिक, आर्थिक, सामाजिक, डिजिटल, वित्तीय, सामुद्री...
12 Nov 2020 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, November 11th, 2020
नवी दिल्ली, ११ नोव्हेंबर – भारत आणि चीनच्या कमांडर पातळीच्या आठव्या फेरीत झालेल्या चर्चेवेळी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील तणाव कमी करण्याची इच्छा चीनने व्यक्त केली आहे. याअंतर्गत पूर्व लडाखमधील पेगॉंग त्सो तलावाच्या उत्तर किनार्यावरील फिंगर-८ मधून पीपल्स लिबरेशन आर्मी माघार घेणार असल्याची माहिती लष्करी सूत्रांनी दिली. चुशूलमध्ये ६ नोव्हेंबर रोजी झालेल्या चर्चेत प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील पेगॉंग त्सो हा भाग भारतीय हद्दीत असून, फिंगर-८ मधून माघार घेण्यास चीन राजी झाला आहे. १४...
11 Nov 2020 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, November 11th, 2020
पंतप्रधानांचा चीन, पाकिस्तानला स्पष्ट संदेश, नवी दिल्ली, १० नोव्हेंबर – शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) सर्व सदस्यांनी सार्वभौमत्व आणि प्रादेशिक एकतेचा सन्मान करायलाच पाहिजे, असा स्पष्ट संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मंगळवारी चीन आणि पाकिस्तानला दिला. एससीओ सदस्यांच्या आभासी स्वरूपात झालेल्या परिषदेत पंतप्रधान मोदी बोलत होते. पूर्व लडाखच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारत-चीनमध्ये निर्माण झालेला तणाव आणि पाकिस्तानने काश्मीर मुद्याचे आंतरराष्ट ?ीयीकरण करण्याचा प्रयत्न केला. त्या पृष्ठभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी...
11 Nov 2020 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Sunday, November 8th, 2020
नवी दिल्ली, ८ नोव्हेंबर – ज्यो बायडेन यांचा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष तर कमला हॅरिस यांचा उपराष्ट्राध्यक्ष म्हणून विजय झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोघांनाही खास शुभेच्छा दिल्या आहेत. ज्यो बायडेन यांना शुभेच्छा देताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांचे अभिनंदन केले. टि्वटमध्ये मोदी म्हणाले की, भव्य विजयाबद्दल तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. भारत-अमेरिका संबंधांसाठी उपराष्ट्राध्यक्ष म्हणून तुम्ही यापूर्वी दिलेले योगदान कौतुकास्पद होते. आता तुम्ही राष्ट्राध्यक्ष झाल्याने भारत-अमेरिका संबंधांना नव्या उंचीवर नेण्यासाठी पुन्हा एकदा तुमच्याबरोबर काम...
8 Nov 2020 / No Comment / Read More »