किमान तापमान : 25.33° से.
कमाल तापमान : 25.77° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 60 %
वायू वेग : 2.06 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
25.77° से.
24.24°से. - 27.77°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर घनघोर बादल24.63°से. - 28.19°से.
रविवार, 24 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.58°से. - 28.88°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.85°से. - 29.25°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.25°से. - 28.36°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर घनघोर बादल23.83°से. - 29.02°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर टूटे हुए बादल– ललनसिंह यांचा राजीनामा,
नवी दिल्ली, (३० डिसेंबर) – जनता दल युनायटेडचे राष्ट्रीय अध्यक्ष ललनसिंह यांनी पदाचा राजीनामा दिला असून, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांची पुन्हा एकदा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली आहे. जदयू राष्ट्रीय कार्यकारिणीच्या आज दिल्लीत झालेल्या बैठकीत हा संघटनात्मक बदल झाला. राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत ललनसिंह यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देत नितीशकुमार यांची पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नियुुक्ती करण्याचा प्रस्ताव मांडला. कार्यकारिणीने या प्रस्तावाला एकमताने मान्यता दिल्यामुळे नितीशकुमार यांची पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होण्याचा मार्ग प्रशस्त झाला.
ललनसिंह पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरून पायउतार होतील आणि नितीशकुमार यांची पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून पुन्हा नियुक्ती होईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात मागील आठवड्यात सुरू झाली होती. बिहारमध्ये जदयू आणि राजद यांची आघाडी आहे. या आघाडीत काँग्रेस आणि अन्य पक्षही आहे. राज्यातील महाआघाडी सरकारचे नेतृत्व नितीशकुमार यांच्याकडे आहे. जदयूचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेले ललनसिंह राजदकडे झुकले होते. लालूप्रसाद यादव आणि यांच्या परिवाराशी त्यांचे संबंध वाढले होते. यामुळे नितीशकुमार ललनसिंह यांच्यावर नाराज झाले होते. त्याची परिणती जदयूतील या संघटनात्मक फेरबदलात झाली असल्याचे मानले जाते.
जदयू राष्ट्रीय कार्यकारिणीच्या दिल्लीतील बैठकीच्या पहिल्या दिवशी ललनसिंह यांनी नितीशकुमार यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली होती. त्यावेळी या दोन नेत्यांमधील मतभेद संपुष्टात आल्याचे सांगितले जात होते. मात्र, आज ललनसिंह यांनी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत अध्यक्षपदावरून उतरण्याची घोषणा केली. ललनसिंह यांना लोकसभा निवडणूक लढवायची असल्यामुळे त्यांनी आपल्याला अध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त करा, अशी विनंती पक्षाकडे केली होती, त्यानुसार त्यांना अध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्यात आले, असे पक्षाचे अन्य एक ज्येष्ठ नेते रामनाथ ठाकूर यांनी म्हटले.