किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलव्हिसा प्रक्रिया आणखी सुलभ होणार,
नवी दिल्ली, (२७ फेब्रुवारी ) – शिक्षण किंवा नोकरीसाठी जर्मनीला जाणार्या भारतीयांसाठी आनंदाची बातमी आहे. भारत भेटीवर असलेले जर्मनीचे चान्सलर ओलाफ शोल्झ यांनी भारतीयांना जर्मनीला जाणे सहज शक्य व्हावे, यासाठी व्हिसा प्रक्रिया आणखी सुलभ करण्यात येणार असल्याची घोषणा केली. जास्तीत जास्त भारतीयांनी आमच्या देशात यावे, असे आवाहन शोल्झ यांनी केले.
जर्मनीतील आयटी क्षेत्रात कुशल कामगारांची कमतरता आहे. त्यामुळे या क्षेत्राशी निगडित कर्मचार्यांसाठी जर्मनीत भरपूर संधी उपलब्ध आहेत. याच पृष्ठभूमीवर ओलाफ शोल्झ यांनी व्हिसा प्रक्रिया सुलभ करण्याची घोषणा केली. शोल्झ यांनी बंगळुरू येथे पत्रकारांशी संवाद साधला. त्यांचे सरकार भारतातील आयटी व्यावसायिकांसाठी वर्क व्हिसा मिळविण्याची प्रक्रिया सुलभ करू इच्छित आहे. जर्मनीला सॉफ्टवेअर डेव्हलपर आणि कुशल आयटी कामगारांना आकर्षित करता यावे, यासाठी कायदेशीर चौकटीत सुधारणा करणे, त्यांच्या सरकारचे प्राधान्य आहे, असे त्यांनी सांगितले.
विदेशी कामगार कामासाठी जर्मनीला पोहोचल्यावर त्यांना भेडसावणार्या भाषेच्या समस्येवरही मत व्यक्त केले. ते म्हणाले की, यात कोणतीही अडचण येऊ नये. लोक जर्मनीमध्ये येतात, तेव्हा ते इंग्रजी बोलतात आणि नंतर हळूहळू जर्मन भाषा स्वीकारतात.