किमान तापमान : 27.51° से.
कमाल तापमान : 27.99° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 51 %
वायू वेग : 3.91 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.99° से.
27.6°से. - 31.02°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर घनघोर बादल27.01°से. - 30.73°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.06°से. - 30.41°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.16°से. - 31.05°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.39°से. - 30.44°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.66°से. - 30.5°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश– देशांतर्गत खुल्या बाजारातील विक्री योजना,
नवी दिल्ली, (२१ नोव्हेंबर) – केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाच्या ओएमएसएस(डी) अर्थात देशांतर्गत खुल्या बाजारातील विक्री योजनेतून रविवार दिनांक १९ नोव्हेंबर २०२३ रोजी ४,६०,१२२ एमटी गहू आणि १६९० एमटी तांदूळाची उचल करण्यात आली.
दिनांक २८ जून २०२३ रोजी एफसीआय अर्थात भारतीय अन्न महामंडळाच्या साठ्यातील गहू आणि तांदळाच्या विक्रीसाठीचा लिलाव सुरु झाला आणि तेव्हापासून दर बुधवारी असा लिलाव करण्यात येतो. आतापर्यंत गव्हाच्या विक्रीसाठीचे २१ आणि तांदळाच्या विक्रीसाठीचे १७ लिलाव झाले आहेत. या लिलावाच्या माध्यमातून ८,३०,९१० एमटी गहू आणि १२,०९,७६० एमटी तांदूळ खुला करण्यात आला असून सरासरी योग्य दर्जाचा गहू २१५० रुपये क्विंटल या राखीव दराने तर वैशिष्ट्यांच्या अटी शिथिल केलेला गहू २१२५ रुपये क्विंटल दराने आहे. त्याचप्रमाणे पोषणयुक्त तांदूळ २९७३ रुपये क्विंटल दराने तर एफएक्यू तांदूळ २९०० रुपये क्विंटल दराने देऊ करण्यात आला आहे.
देशांतर्गत खुल्या बाजारातील विक्री योजनेच्या ओएमएसएस(डी) माध्यमातून गहू आणि तांदळाच्या विक्रीसाठी केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने दिलेल्या मान्यतेनुसार, गिरण्या, धान्यांवर प्रक्रिया करणारे तसेच गव्हापासून इतर उत्पादनांची निर्मिती करणारे यांना ई-लिलावाच्या माध्यमातून केंद्राच्या साठ्यातून ५० लाख मेट्रिक टन गहू उपलब्ध करून देण्यासाठी त्याचप्रमाणे, ओएमएसएस(डी) च्या माध्यमातून२५ लाख मेट्रिक टन तांदळासाठी देखील मंजुरी देण्यात आली आहे.
गव्हाच्या वाढत्या किंमतींवर नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशाने प्रत्येक पॅन कार्ड साठी १००मेट्रिक टन गव्हाच्या विक्रीची मर्यादा घालून देण्यात आली आहे जेणेकरून दर स्थिरीकरणाचे लाभ खर्या ग्राहकांपर्यंत पोहोचतील. तांदूळ उत्पादक आणि त्यावर प्रक्रिया करणारे यांच्यासह, तांदळाचे व्यापारी देखील विक्री लिलाव प्रक्रियेत सहभागी होऊ शकतील. सुधारित मार्गदर्शक तत्त्वांनुसार, या लिलाव प्रक्रियेत बोली लावणार्याला १० मेट्रिक टनांपासून जास्तीतजास्त २०० मेट्रिक टन गव्हासाठी तसेच १० मेट्रिक टन ते जास्तीतजास्त एक हजार मेट्रिक टन तांदळासाठी बोली लावता येईल. भारतीय अन्न महामंडळाच्या राखीव साठ्यातून गहू आणि तांदूळ बाजारात उतरवल्यामुळे या धान्यांच्या चढ्या दराना आळा बसणार आहे.