किमान तापमान : 24.75° से.
कमाल तापमान : 26.24° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 58 %
वायू वेग : 6.52 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.24° से.
23.74°से. - 26.99°से.
रविवार, 12 जानेवारी कुछ बादल22.24°से. - 25.48°से.
सोमवार, 13 जानेवारी कुछ बादल23.36°से. - 26.54°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश23.78°से. - 25.15°से.
बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश23.96°से. - 25.5°से.
गुरुवार, 16 जानेवारी टूटे हुए बादल24.28°से. - 26.06°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादल– गृह मंत्रालयाचा आदेश,
नवी दिल्ली, (२३ ऑक्टोबर) – मुधोळ हाऊंड, रामपूर हाऊंड, गड्डी आणि बखरवाल या भारतीय प्रजातीच्या श्वानांना पोलिस श्वान म्हणून तैनात केले जाण्याची शक्यता आहे. त्यांचा वापर संशयित, अमली पदार्थ आणि स्फोटके शोधून काढण्यासाठी केला जाईल तसेच उच्च जोखीम असलेल्या भागात गस्त घालण्यात येईल, असे अधिकार्यांनी सांगितले. आतापर्यंत या कामासाठी परदेशी जातीचे श्वान ठेवले जात होते. केंद्रीय सशस्त्र पोलिस दल (सीएपीएफएस) जसे बीएसएफ, सीआरपीएफ आणि सीआयएसएफ पोलिस कर्तव्यांसाठी भारतीय श्वानांच्या प्रजातींची भरती करण्यासाठी सज्ज आहेत. रामपूर हाऊंडसार‘या काही श्वानांची चाचणीही सुरू आहे. हिमालय पर्वतावरील श्वानांची चाचणी घेण्याचा आदेशही जारी करण्यात आला आहे.
सध्या सर्वच पोलिस श्वान जर्मन शेफर्ड, लॅब्राडोर, बेल्जियन मालिनॉइस आणि कॉकर स्पॅनियल यासार‘या विदेशी प्रजाती आहेत. गृह मंत्रालयाच्या एका अधिकार्याने सांगितले की, भारतीय श्वान जातीच्या मुधोल हाऊंडची चाचणी एसएसबी आणि आयटीबीपीने आधीच पूर्ण केली आहे. रामपूर हाऊंडसारख्या इतर काही भारतीय श्वानांच्या जातींची चाचणी सीआरपीएफ आणि बीएसएफच्या श्वान प्रशिक्षण केंद्रांमध्ये सुरू आहे. याशिवाय, मंत्रालयाने हिमाचल शेफर्ड, गड्डी, बखरवाल आणि तिबेटी मास्टिकसार‘या हिमालयीन पर्वतीय श्वानांची सीमा सुरक्षा दल (बीएसएफ), इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलिस (आयटीबीपी) आणि सशस्त्र सीमा बल (एसएसबी) यांच्याकडून चाचणी घेण्याचा आदेश दिला आहे. सध्या त्यांची चाचणी सुरू आहे. पंतप्रधान मोदी यांनी याआधीच वैज्ञानिक पद्धतींद्वारे स्थानिक श्वानांच्या जातींना प्रोत्साहन देण्याबाबत म्हटले होते.
श्वान के-९ पथकाचा भाग
सीएपीएफद्वारे भाड्याने घेतलेले सर्व श्वान पोलिस सेवा के-९ पथकांचा भाग आहेत. सीएपीएफ पोलिस कर्तव्यासाठी श्वान भाड्याने देते आणि प्रशिक्षण देतात. ते बीएसएफ, सीआरपीएफ, सीआयएसएफ, आयटीबीपी, एसएसबी, एनएसजी आणि आसाम रायफल्स आहेत. पोलिस श्वानांना गस्त आणि इतर कामांव्यतिरिक्त आयईडी आणि खाणी, अमली पदार्थ आणि बनावट चलन शोधणे यासार‘या कामांसाठी प्रशिक्षण दिले जाते.