किमान तापमान : 24.82° से.
कमाल तापमान : 26.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 54 %
वायू वेग : 3.89 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.99° से.
23.74°से. - 26.99°से.
रविवार, 12 जानेवारी कुछ बादल22.24°से. - 25.48°से.
सोमवार, 13 जानेवारी कुछ बादल23.36°से. - 26.54°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश23.78°से. - 25.15°से.
बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश23.96°से. - 25.5°से.
गुरुवार, 16 जानेवारी टूटे हुए बादल24.28°से. - 26.06°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादल१० श्वान, २० घोड्यांचा समावेश,
ढाका, ११ नोव्हेंबर – भारत आणि बांगलादेशमधील द्विपक्षीय संबंध अधिक दृढ व्हावे म्हणून भारतीय सैन्याने बांगलादेशला २० पूर्ण प्रशिक्षित लष्करी घोडे आणि १० खाण-तपासणी श्वान भेट दिले. घोड्यांना प्रशिक्षण देणार्या भारतीय सैन्य दलाच्या अधिकार्यांनी आणि पशुवैद्यकीय वाहिनीद्वारे या घोड्यांना आणि श्वानांना प्रशिक्षण देण्यात आले होते, असे एका निवेदनात म्हटले आहे.
हे प्रशिक्षित श्वान आणि घोडे हाताळण्यासाठी भारतीय सैन्य दलाद्वारे बांगलादेशच्या सैन्य जवानांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. भारत-बांगलादेश सीमेवर पेत्रापोल -बेनापोल सीमाचौकीवर हस्तांतरण समारंभ आयोजित करण्यात आला होता. ढाका येथील भारतीय उच्चायोगाचे ब्रिगेडियर जे. एस. चीमा देखील या कार्यक्रमास उपस्थित होते.
भारतीय लष्कराच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व ब्रह्मास्त्र कॉर्प्सचे चीफ ऑफ स्टाफ मेजर जनरल नरिंदरसिंग खुरोड यांच्याकडे होते, तर बांगलादेश सैन्याच्या प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व मेजर जनरल मोहम्मद हुमायून कबीर यांनी केले. भारतीय सैन्यातील श्वानांचा पराक्रम नेहमी कौतुकास्पद राहिला आहे. सुरक्षेसंदर्भात आम्ही बांगलादेशसारख्या मैत्रीपूर्ण देशाला मदत करण्यास नेहमीच तयार आहोत. जेव्हा सुरक्षेचा प्रश्न येतो तेव्हा, श्वानांनी त्यांचे कौशल्य सिद्ध केले आहे. बांगलादेशला सुपूर्द केलेले श्वान खाण तपासणी आणि इतर कौशल्यांनी परिपूर्ण आहेत, असे मत वरिष्ठ सैन्य अधिकार्यांनी मांडले. बांगलादेशसोबत असलेली भारताची ही भागीदारी चांगल्या शेजारी संबंधांचे आदर्श उदाहरण आहे. या घटनेने दोन्ही देशातील सामायिक संबंध अधिक मजबूत होण्याची आशा उपस्थित अधिकार्यांनी वर्तवली.