किमान तापमान : 23.22° से.
कमाल तापमान : 23.68° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 6.13 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.22° से.
22.99°से. - 26.27°से.
शुक्रवार, 24 जानेवारी टूटे हुए बादल23.33°से. - 26.99°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
सोमवार, 27 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
मंगळवार, 28 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
बुधवार, 29 जानेवारी टूटे हुए बादल– सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळेंचे प्रतिपादन,
हमीरपूर, (२९ जानेवारी) – समाजातील प्रत्येक घटकाचा सहभाग आणि सहयोग यातूनच भारत विश्वगुरू बनेल. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समाजाला जागृत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. आज धर्मांतरणाच्या कटात अनेक देशी-विदेशी शक्ती सक्रिय आहेत. या आव्हानांचा सामना करण्याची ताकद संघटित शक्तीतच आहे, असे ठाम प्रतिपादन रा. स्व. संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी केले. हमीरपूरच्या टिप्पर येथे हिमाचल प्रांताच्या संघ शिक्षा वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. या शिक्षा वर्गाच्या समारोप समारंभात सरकार्यवाह बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवृत्त ब्रिगेडियर अजय कुमार शर्मा होते.
देशातील लोकांचे परिश्रम, आपल्या प्रतिभेचा विकास आणि पुरुषार्थाच्या संघटित होण्यानेच एक दिवस भारताचे विश्वगुरू होण्याचे ध्येय साकारणार आहे. भारतातील युवक देशनिर्माणाच्या कार्यात आपला सहभाग देऊ इच्छितो आणि संघ त्यांना या कर्तव्याची प्रेरणा देत आहे. युवकांनी स्वामी विवेकानंदांचा आदर्श समोर ठेवायला हवा. त्यांनी आपल्या शारीरिक शक्तीचा विकास केला पाहिजे. समाजाला सशक्त करण्यासाठी संघटना हेच खरे माध्यम आहे, असे होसबळे म्हणाले.
सेवानिवृत्त ब्रिगेडियर अजय कुमार शर्मा यांनी संघ शिक्षा वर्गाची प्रशंसा करीत, चांगल्या नागरिकांना घडवण्यात संघाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे गौरवोद्गार काढले. कार्यक्रमाला क्षेत्र संघचालक डॉ. सीताराम व्यास, क्षेत्र प्रचारक बनवीरसिंह, क्षेत्र प्रचारक प्रमुख रामेश्वर दास यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रशिक्षण वर्गाचा शुभारंभ ८ जानेवारी रोजी झाला होता. यात १५ ते ४० वर्षांच्या एकूण २९९ स्वयंसेवकांनी सहभाग नोंदविला. या वर्गात हिमाचल प्रांताच्या २६ पैकी २५ जिल्ह्यातील २६९ स्वयंसेवकांसह जम्मू-काश्मिरातील २७, पंजाबमधून १, जयपूर येथील दोन स्वयंसेवकांचा समावेश होता. यात विद्यार्थी, शेतकरी, दुकानदार, अभियंते, वकील, प्राध्यापकांसह पत्रकारही होते.