किमान तापमान : 30.79° से.
कमाल तापमान : 30.99° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 55 %
वायू वेग : 0.89 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
30.99° से.
27.34°से. - 30.99°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.73°से. - 29.67°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.66°से. - 30.59°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.36°से. - 31.64°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.5°से. - 30.53°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.69°से. - 30.56°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश– विदेशी निधी मिळविण्यासाठी सरकारी मान्यता बंधनकारक,
नवी दिल्ली, (१८ जानेवारी) – कायद्याचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली केंद्रीय गृह मंत्रालयाने काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांच्या मुलीच्या सेंटर फॉर पॉलिसी रिसर्च या संस्थेचा एफसीआरए परवाना रद्द केला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर निधी प्राप्त करण्यासाठी सरकारी आणि गैर-सरकारी संघटनांना एफसीआरए नोंदणी अत्यंत गरजेची असते.
काँग्रेस नेता मणिशंकर अय्यर यांची मुलगी यामिनी अय्यर सेंटर फॉर पॉलिसी रिसर्च (सीपीआर) संस्थेच्या अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आहेत. ही संस्था एकविसाव्या शतकातील आव्हानांच्या मुद्यावर संशोधन करीत आहे. संबंधित संस्थेला देशाच्या अंतर्गत आणि आंतरराष्ट्रीय संस्थांकडून निधी मिळत असतो. दरम्यान, संस्थेच्या काही व्यवहारात त्रुटी आढळल्याने तसेच त्या संदर्भातील तरतुदींचे उल्लंघन केल्याने केंद्र सरकारने एफसीआरए परवाना रद्द करण्याची कारवाई केली. पुढील आदेशापर्यंत सीपीआरला विदेशातील संस्थांकडून कोणताही निधी मिळविता येणार नाही. याशिवाय आयकर विभागानेही सप्टेंबर २०२२ मध्ये विदेशी निधीसंदर्भात सेंटर फॉर पॉलिसी रिसर्चची चौकशी केली होती.