किमान तापमान : 24.99° से.
कमाल तापमान : 25.79° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 47 %
वायू वेग : 5.84 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.99° से.
24.11°से. - 25.77°से.
शुक्रवार, 24 जानेवारी छितरे हुए बादल23.33°से. - 26.99°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.01°से. - 27.57°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.47°से. - 27.72°से.
सोमवार, 27 जानेवारी टूटे हुए बादल25.66°से. - 27.64°से.
मंगळवार, 28 जानेवारी साफ आकाश25.05°से. - 27.04°से.
बुधवार, 29 जानेवारी टूटे हुए बादलपरमबीरसिंहांच्या पत्राचे लोकसभेत पडसाद, भाजपा सदस्यांचा राज्य सरकारवर हल्लाबोल,
नवी दिल्ली, २२ मार्च – मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंह यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या खंडणी वसुलीच्या आरोपांचे संतप्त पडसाद आज लोकसभेत उमटले. या मुद्यावरून भाजपा सदस्यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवला आणि राष्ट्रपती राजवटीची मागणी केली.
भाजपाचे गिरीश बापट, नवनीत राणा, पूनम महाजन, कपिल पाटील आदी सदस्यांनी शून्य तासात अतिशय आक्रमकपणे हा मुद्दा उपस्थित केला. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी या सर्व सदस्यांनी केली. सरकारवर १०० कोटी रुपयांच्या वसुलीचा आरोप झाला. या सरकारने आतापर्यंत किती वसुली केली असेल, या शब्दात सरकारवर हल्ला चढवताना पूनम महाजन म्हणाल्या की, कोण कोणासाठी काम करीत आहे, हेच समजत नाही. आम्ही राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी करीत असताना शिवसेनेला मिर्च्या का झोंबतात, असे महाजन म्हणाल्या.
पूर्वी गुन्हेगार खंडणी वसूल करीत होते. आता सरकारच खंडणी वसुली करीत असल्याचा आरोप गिरीश बापट यांनी केला. भाजपाचे मनोज कोटक यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
घटनाक्रमासाठी उद्धव ठाकरेच जबाबदार : नवनीत राणा
अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा या मुद्यावरून अतिशय आक्रमक होत्या. महाराष्ट्रातील घटनाक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. १६ वर्षांपासून निलंबित असलेल्या सचिन वाझे यांची वकिली का करीत आहे, हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगावे, असे त्या म्हणाल्या. देवेंद्र फडणवीस यांचे सरकार असतानाही ठाकरे यांनी वाझे यांना पोलिस सेवेत परत घेण्याची मागणी केली होती, याकडे त्यांनी लक्ष वेधले.