किमान तापमान : 30.02° से.
कमाल तापमान : 30.99° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 48 %
वायू वेग : 2.46 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
30.99° से.
27.48°से. - 31.19°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल26.76°से. - 31°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश25.88°से. - 29.76°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.49°से. - 30.23°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर छितरे हुए बादल25.3°से. - 30.25°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर साफ आकाश25.38°से. - 29.76°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर छितरे हुए बादलनवी दिल्ली, (०५ सप्टेंबर) – देशातील बहुतांश राज्यांत मान्सूनने दडी मारली आहे. मागील काही दिवसांपासून लोकांना दमटपणाचा सामना करावा लागत आहे. आता चित्र बदलणार आहे. काही राज्यांमध्ये पावसाचा तर, काही राज्यांमध्ये उष्णता वाढण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. आगामी दोन दिवस राजधानी दिल्लीत दिवसा ढगाळ वातावरण आणि रात्री हलका पाऊस अशी स्थिती राहू शकते. दिल्लीत कमाल तापमान ३७ अंश आणि किमान तापमान २७ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील विदर्भासह काही भागांमध्ये पावसाचा अंदाज आहे. ओडिशा आणि छत्तीसगडमध्ये पुढील ४ दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
उत्तरप्रदेशात उष्णतेची लाट
उत्तरप्रदेशात पुढील काही दिवस उष्णतेची लाट असणार आहे. तथापि, काही भागांत हलक्या पावसाचीही शक्यता आहे. उत्तराखंडच्या काही भागांत आठवडाभरानंतर जोरदार पाऊस झाला. हवामान खात्याने बागेश्वर, पिथौरागढ, अल्मोडा आणि चंपावत या जिल्ह्यांत दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. याशिवाय, ईशान्य भारत, मध्यप्रदेशातही मुसळधार पाऊस पडणार आहे.
विदर्भातही पावसाची शक्यता
विदर्भात आगामी दोन दिवस पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. चंद्रपूर, गडचिरोली या दोन जिल्ह्यांत पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. उर्वरित विदर्भात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. बुधवारी नागपूर, चंद्रपूर, वर्धा, अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट राहणार आहे.